घोटी : इगतपुरी तालुक्यातील जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने घोटी येथील दोन तरुणींना दीक्षा घेण्याची आज्ञा मिळाल्यानंतर नोखामंडी येथे १८ जुलै रोजी दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने घोटी जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या वतीने वरघोडा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
घोटीतील उद्योजक पारस चोरडिया यांच्या दोन्ही कन्या मुमुक्षू खुशबूबेन व श्वेताबेन दीक्षा घेत आहेत. शोभायात्रेप्रसंगी अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स न्यू दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. संघपती नंदकुमार शिंगवी व संजय चोरडिया यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. जैन धर्मामध्ये दीक्षा विधीला सर्वोच्च महत्त्व आहे. संमोहरूपी संसाराचा त्याग करून वैराग्य घेणे याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मोदी यांनी सांगितले. याप्रसंगी जैन कॉन्फरन्स महाराष्ट्र अध्यक्ष ललित मोदी, ज्ञानगछ शाखेचे अध्यक्ष विजय गोगड, आनंद साभद्रा, नंदलाल शिंगवी, किसनलाल पीचा, नवसुखलाल पिचा, उमेद पीचा, संजय चोरडिया, चांदमल भन्साळी, पंकज भंडारी, डॉ. वालचंद चोरडिया, विजय कर्नावट, विजय पीचा, दीपक चोरडिया, मुन्ना किसनलाल पीचा, प्रवीण पीचा, नितीन चोरडिया, तुषार बोथरा, उदय जाधव, निवृत्ती जाधव, रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू, गौरव पगारिया, राजेश लोढा, धर्मेश नहाटा, सचिन ब्रह्मेेचा, विलास भाटजीरे आदी मान्यवर उपस्थित होते. (०६ घोटी १/२)
060721\06nsk_17_06072021_13.jpg
०६ घोटी १/२