पाथरे येथे खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 05:55 PM2020-12-29T17:55:41+5:302020-12-29T17:56:33+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा यात्रोत्सव हा आवर्तन पद्धतीने वारेगावकडे आला होता.
दत्तजयंतीच्या दिवशी गावातून खंडोबा महाराज मुखवट्याची मिरवणूक, मोजक्या संख्येत कावडी, डफांच्या तालावर तरुणांचे नृत्य, गोंधळ गायन आणि नृत्याच्या तालावर मिरवणूक गावातून काढण्यात आली. ग्रामस्थांनी, महिलांनी रथाच्या मार्गावर सडा, रांगोळी काढली होती. यावेळी सुवासनींनी खंडोबा महाराज मुखवट्याचे पूजन केले. मोजक्या भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. दत्तजयंती उत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गामुळे यात्रोत्सव मिरवणूक अतिशय शांततेत, तसेच कोरोना नियमात पार पडली. भाविकांनी नियमात खंडोबा महाराज मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले.