पुरोगामी राज्यात सावित्रीबाई फुले यांची उपेक्षा,कुलगुरू ई वायुनंदन यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:00 PM2018-02-18T17:00:06+5:302018-02-18T17:02:11+5:30
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी व्यक्त केली.
नाशिक : महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महापुरुषांची परंपरा लाभली आहे. महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी विचारसरणी लाभलेल्या महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फु ले यांच्या कतरुत्वाची मात्र उपेक्षा होत असल्याची खंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन यांनी व्यक्त केली.
इंडिपेंडन्ट सेकं डरी अॅण्ड हायर सेकंडरी टिचर्स युनियन महाराष्ट्र राज्यतर्फे (इश्तू)वर्धापन दिनानिमित्त मु. शं. औरंगाबादकर सभागृहात आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार वितरण सोहळ्य़ात त्या बोलत होते. व्यासपीठावर गझलकार अशरद मिनाकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, प्रा. गंगाधर अहिरे आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना देशात गायीपेक्षा बाई अधिक असुरक्षित असल्याचा सूर आवळला. त्यावरच पुढे बोलताना ई-वायुंदन यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान असले तरी त्यांना जो सन्मान मिळणो अपेक्षित आहे. तो अद्यापही मिळाला नसल्याची खंत वायुनंदन यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक रोहीत गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. राजेंद्र मोहीते यांनी आभार मानले.
पुरस्कारार्थी शिक्षक
इश्तुतर्फे संजय भामरे, प्राचार्य राम कुलकर्णी, के. एन. अहिरे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर प्रशांत नरवाडे, जयराम घारे, सचीन खरे, भाऊसाहेब खरे, भाऊराव राऊत, धनंजय सोनवणो, भीमराव उबाळे, शिवाजी भालेराव, गणपत बेंडकोळी, निलेश ठाकूर विजयकुमार बावा, प्रकाश कोळी, दिनकर पवार, तरन्नुम काझी, आशा डावरे, सुलभा बच्छाव, प्रमिला पवार, कमल आढाव, वाजेदा देशमुख यांना शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर भाऊसाहेब बोराडे यांना शित्रकेत्तर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.