प्रकल्पग्रस्त प्रकल्पाच्या बाहेर जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:52+5:302020-12-04T04:37:52+5:30

सिन्नर : रतन इंडियातील सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पातील १२५ कामगारांचे गेटबंद आंदोलन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या यशस्वी मध्यस्थीने दहाव्या ...

The project will not go beyond the project | प्रकल्पग्रस्त प्रकल्पाच्या बाहेर जाणार नाही

प्रकल्पग्रस्त प्रकल्पाच्या बाहेर जाणार नाही

Next

सिन्नर : रतन इंडियातील सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पातील १२५ कामगारांचे गेटबंद आंदोलन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या यशस्वी मध्यस्थीने दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. प्रकल्पग्रस्त बाहेर जाणार नाही, कामगारांचे थकीत चार महिन्यांपैकी किमान दोन ते तीन महिन्यांचे वेतन येत्या महिनाभरात अदा करावे, असे आमदार कोकाटे यांनी व्यवस्थापनाला सुचविले. त्यामुळे कामगार कामावर पूर्ववत रुजू होणार आहेत.

चार महिन्यांचे थकीत वेतन व दिवाळीचा बोनस मिळावा याकरिता कामगारांनी दहा दिवसांपूर्वी व्यवस्थापनाच्या भूमिकेविरोधात एल्गार करीत बेमुदत गेटबंद आंदोलन पुकारले होते. दरम्यानच्या काळात कामगारांच्या शिष्टमंडळाने आमदार कोकाटे, खासदार गोडसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भेटी घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले होते.

आमदार कोकाटे यांनी सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त कामगारांच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा घाट घातला. चार महिन्यांची बिनपगारी सुटी देऊन कामगारांना घरचा रस्ता दाखविण्याचा त्यांचा डाव असल्याचे कामगार प्रतिनिधींच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रस्ताव धुडकावला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड सातत्याने कामगारांच्या संपर्कात होते. त्यांनी कामगारांना धीर देत व्यवस्थापनाकडे बाजू लावून धरली.

आमदार कोकाटे यांनी काल कामगारांसह व्यवस्थापनाशी चर्चा केली. एकदा प्रकल्प सुरू झाला तर आयुष्याचे कल्याण होणार आहे. त्यामुळे काम सुरू करावे आणि व्यवस्थापनाने महिनाभराच्या आत थकीत वेतन अदा करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्यामुळे प्रकल्प उभा राहू शकला आहे. यामागे मुसळगाव व गुळवंचच्या शेतकर्‍यांचा मोठा त्याग आहे. त्यामुळे इथल्या प्रकल्पग्रस्तांना झिडकारून चालणार नाही, ही बाब व्यवस्थापनाने लक्षात घ्यावी, असेही आमदार कोकाटे यांनी अधोरेखित केले.

यावेळी कोंडाजी आव्हाड, दातलीचे माजी सरपंच पंढरीनाथ आव्हाड, व्यवस्थापनाचे अधिकारी अभिमन्यूसिंह राठोड यांच्यासह कामगार उपस्थित होते.

पगार झाला नाही तर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार यात शंका नाही; पण तरीदेखील कामगारांनी आततायीपणा करू नये. महिना-दोन महिन्याच्या पगाराकडे लक्ष केंद्रित करून काहीबाही केल्यास वातावरण बिघडून जाईल. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होईल, ही बाब आमदार कोकाटे यांनी कामगारांच्या निदर्शनास आणून दिली. महिना-दोन महिन्याचा पगार आयुष्यभराला पुरणार नाही. मात्र काही काळ काटकसरीने घालवला तर आयुष्यभराचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. ही बाब कामगारांना पटली.

प्रकल्प सुरू होण्यासाठी पोषक वातावरण राहणे आवश्यक आहे. प्रकल्प सुरू करणे अवघड बाब असली तरी मी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. केवळ प्रकल्पग्रस्तांसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. कामगारांना कामावरून काढू नये, अशा सूचना व्यवस्थापनाला केल्या असून, प्रकल्प सुरू करण्याची हमी आपण घेतली आहे.

- माणिकराव कोकाटे

आमदार, सिन्नर

===Photopath===

031220\03nsk_3_03122020_13.jpg

===Caption===

सिन्नर थर्मल पॉवरच्या आंदोलनकर्त्या कामगारांसोबत चर्चा करताना आमदार माणिकराव कोकाटे.०३ सिन्नर ३

Web Title: The project will not go beyond the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.