फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:07 AM2018-03-01T02:07:06+5:302018-03-01T02:07:06+5:30

गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

The prolonged launch of the Funicular Trolley | फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर

फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर

Next

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. दुसरीकडे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सप्तशृंगगडावर काही कामे अद्यापही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्र तसेच नवरात्रोत्सवात यात्राही भरत असते. डोंगरावर स्वयंभू असलेल्या देवीच्या दर्शनास जाण्यासाठी सुमारे ५६१ पायºयांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात पर्यटनमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट दिले होते. बीओटी तत्त्वावर व परदेशाच्या धर्तीवर जवळपास दोन वर्षे या ट्रॉलीचे काम सुरू होते. अवघ्या तीन मिनिटात दर्शन रांगेपर्यंत पोहोचविणारी व एकाच वेळी ६० व्यक्तींची वाहतूक ट्रॉलीच्या माध्यमातून होणार आहे. तासाला १२०० भाविकांना दर्शन घडवून पुन्हा गडावरून खाली परत आणणारी ही ट्रॉली भारतात पहिलीच असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मध्यंतरी या ट्रॉलीची क्षमता व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करण्यासाठी परदेशी कंपनीच्या पथकाने पाहणीही केली. त्यामुळे ट्रॉलीचे काम पूर्ण झाले असल्याने ठेकेदार सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रॉलीचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा प्रदर्शित करून तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते व मुख्यमंत्र्यांनीही त्यास अनुकूलता दर्शवून जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला होता.
त्यादृष्टीने मंगळवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निरोध प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी गडावर भेट देऊन फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणीही घेतली होती. प्रत्यक्ष मंदिराच्या गाभाºयाला भेट देऊन भाविकांना ये-जा करण्यासाठी येणाºया अडचणींचा विचार करता काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत, तर आपत्ती व्यवस्थापन विभागानेदेखील येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याची तयारी दर्शविली. परंतु मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित दौरा तूर्त पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याने ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

Web Title: The prolonged launch of the Funicular Trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.