नांदूरवैद्य : नाशिक विभागीय सहसंचालक अंतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार आदीं जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, यासह विविध कृषी विभागातील पदांच्या पदोन्नती करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.नाशिक विभागीय कृषि सहसंचालक अधिनस्त नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हयाचा समावेश येतो. कृषि विभागात कृषि सहाय्यक तसेच कृषी पर्यवेक्षकांची पदे कमी असल्यामुळे या पदांच्या पदोन्नती करण्यास अनेक वर्ष वाट पहावी लागते. याच पाशर््वभूमीवर दिनांक ३१ जुलै रोजी कृषी विभागातील ४० कृषि सहाय्यकांना कृषि पर्यवेक्षक पदी पदोन्नतीचे आदेश पारीत करण्यात आले आहे.सदर कर्मचाऱ्यांनी कृषि सहाय्यक म्हणुन १८ ते ३० वर्ष काम केले आहे. पदोन्नती कामी प्रभारी विभागीय कृषि सहसंचालक पडवळ, विभागीय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वानखेडे, प्रभारी प्रशासन अधिकारी वारघडे, व सहाय्यक प्रशासन अधिकारी गायकवाड यांच्या सहकार्याने पदोन्नत्या पार पडल्या. याच बरोबर इगतपुरीचे नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक परिसरातील कृषी सहाय्यक एस. डी. चव्हाण यांचीही यावेळी पदोन्नती करण्यात आली आहे.यापुढेही कृषि सहाय्यकांना वेळेत पदोन्नती मिळावी अशी कृषि सहाय्यक संघटनेची मागणी आहे. पदोन्नती आदेश काढल्याबाबत कृषि सहाय्यक संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष थेटे, जळगाव जिल्हा अध्यक्ष उल्हास पाटील व धुळे जिल्हा अध्यक्ष तुषार मराठे यांनी प्रशासनाचे आभार मानले.
कृषी विभागात विविध पदांच्या पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 3:40 PM
नांदूरवैद्य : नाशिक विभागीय सहसंचालक अंतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार आदीं जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृषी विभागातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, यासह विविध कृषी विभागातील पदांच्या पदोन्नती करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
ठळक मुद्दे४० कृषि सहाय्यकांना कृषि पर्यवेक्षक पदी पदोन्नतीचे आदेश पारीत करण्यात आले आहे.