महामार्गावरील रस्त्याच्या कामाला तातडीने सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 04:06 PM2020-08-29T16:06:54+5:302020-08-29T16:08:29+5:30

ओझर-: येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली असतांना ओझर शहर शिवसेना व युवा सेनेने तीन दिवसांत काम सुरू न केल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले.

Prompt commencement of road works on the highway | महामार्गावरील रस्त्याच्या कामाला तातडीने सुरवात

महामार्गावरील रस्त्याच्या कामाला तातडीने सुरवात

Next
ठळक मुद्देसंबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत होते.

ओझर-: येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली असतांना ओझर शहर शिवसेना व युवा सेनेने तीन दिवसांत काम सुरू न केल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले.
येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली होती. या एक किमी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने अनेक छोटे छोटे अपघात या ठिकाणी होत होते. ओझर शहर शिवसेना व युवा सेनेच्या च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांना तसेच संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा सांगुन देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत होते. अखेर शिवसेना तालुका उपप्रमुख प्रकाश महाले, युवासेना तालुका प्रमुख आशिष शिंदे, विभाग प्रमुख प्रशांत पगार, कामेश शिंदे गण प्रमुख विशाल मालसाने गुणेंद्र तांबट पिंटु शिंदे आदिंनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता सागर पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना या रस्ताची दुरवस्था समक्ष दाखवली. हे काम तीन दिवसांत काम सुरू केले नाही तर टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला. धास्तावलेल्या ठेकेदाराने दोन दिवसापुर्र्वी माती मिश्रित मुरूमाने खड्डे भरण्यास सुरवात केली. शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन रस्ताची डागडुजी डांबरीकरणाने करावी असे सांगत ते काम बंद करून संबंधित ठेकेदारास सुनावले. अखेर ठेकेदाराने या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होईल अशी हमी देत तातडीने काम सुरू केले. दरम्यान, खड्ड्याची बातमी प्रसिद्ध होताच युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना देखील पत्र लिहून महामार्ग खड्डे मुक्त नाही झाल्यास टोल नाका बंद करून आंदोलन करन्यात येईल असे सांगितले होते. त्यामुळे याची त्वरित दखल घेत रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरू झाले.
-------------------------------
ओझर येथील सायखेडा फाटा ते गडाख चौफुली रस्ताचे सुरू असलेले काम.(२८ ओझर ३/४)

Web Title: Prompt commencement of road works on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.