बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले असल्यामुळे सध्या खड्डे जाणवत नाहीत. मात्र, सध्या मेनरोड या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानकात प्रवेश करण्याच्या दोन्ही मार्गांवर रस्ता कामामुळे चिखलाची दलदल आहे. त्यामुळे काही वेळा बसेसची चाके चिखलात फसतात. कोरोनामुळे सप्तश्रुंगी गडावरील नवरात्रौत्सव व चैत्रोत्सव या दोन्ही यात्रा बंद करण्यात आल्यामुळे त्याचा कळवण आगाराला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. शिवाय लॉकडाऊन व कोरोनामुळे आगाराचे ५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे कळवण आगारातून लांब व मध्यम पल्ल्याच्या व सर्वसाधारण अशा नियमित ४५ बसेस सुरू आहेत. पूर्वी ७५ बसेस सुरू होत्या. प्रवासी वर्गाकडून अल्प व चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज ११० फेऱ्या होत आहेत. सर्व बसेस दररोज स्वच्छ केल्या जात असून, बस जाताना व येताना प्रवासी, चालक व वाहक यांना सॅनिटायझर केले जाते. बस स्थानक कॅबिनमध्ये तापमापक यंत्र ठेवण्यात आले असून, प्रवासींचे तापमान मोजण्यात येते. कळवण आगारात प्रशासकीय, पर्यवेक्षक, वर्कशॉप, चालक, वाहक असे ४२७ कर्मचारी सेवेत आहेत. बसेस कमी व फेऱ्या कमी असल्यामुळे चालक व वाहक यांना डयुटी मिळत नाही.
कोट....
कळवण आगारातील एसटीचालक व वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, एक कर्मचारी फक्त पॉझिटिव्ह आला असून सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांना मात्र कोरोना लस दिलेली नाही.
कळवण आगारात शासनाच्या सर्व नियमांचे पालन कर्मचारी यांच्याकडून केले जात असून, बस मार्गस्थ होताना स्वच्छ केली जाते. प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्याकरिता प्रस्ताव शासनस्तरावर दाखल केला आहे.
- हेमंत पगार,
डेपो मॅनेजर, कळवण
फोटो- ३१ कळवण बसस्टॅण्ड
310721\435131nsk_26_31072021_13.jpg
फोटो- ३१ कळवण बसस्टॅण्ड