कोरोनाबाधितांवर उपचारासाठी संरक्षित पेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:19 AM2020-04-09T00:19:40+5:302020-04-09T00:19:57+5:30
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे जोखमीचे काम! अनेक ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर बाधितावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एचएएलने एरोसेल बॉक्स तयार केले आहे. ही संरक्षित पेटी त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला उपलब्ध करून दिली आहे. उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना ही पेटी उपयुक्त ठरणार असून, महापालिकेने अशा दहा बॉक्सची मागणी नोंदविली आहे.
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे जोखमीचे काम! अनेक ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर बाधितावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एचएएलने एरोसेल बॉक्स तयार केले आहे. ही संरक्षित पेटी त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला उपलब्ध करून दिली आहे. उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना ही पेटी उपयुक्त ठरणार असून, महापालिकेने अशा दहा बॉक्सची मागणी नोंदविली आहे.
एचएएलने सामाजिक दायित्व निधीतून महापालिकेला या पेट्या देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या कोरोना आजार जगभर चिंतेचा विषय ठरला आहे. त्यातून अपुºया वैद्यकीय उपकरणांची उणीव अधोरेखित झाली आहे. व्यक्तिगत सुरक्षा साधनांची गरज स्पष्ट झाल्यानंतर अनेक संस्था, उद्योजक आणि अभियंत्यांनी आता नवीन संशोधने सुरू केली आहेत. त्यात लढाऊ विमाने तयार करणाºया तसेच देखभाल दुरुस्ती करणाºया एचएएलनेदेखील पुढाकार घेतला आहे.
कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीचा त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांनादेखील संसर्ग होऊ शकण्याची भिती असते. त्यामुळे अशा वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान ऐरोनॉटिकल लि. अर्थात एचएएलच्या वैद्यकीय टीमचे नवे एरोसेलचे बॉक्स उपयुक्त ठरत आहेत. एचएएलने कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक्रॉलिक मेटलपासून एरोसोल बॉक्स (संरक्षित पेटी) तयार केली असून त्यामुळे रुग्णांचा वैद्यकीय कर्मचाºयांशी थेट संबंध येऊ शकणार नाही. एचएएलने तयार केलेला पहिला बॉक्स महापालिकेला दिला असून, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारीही सुरक्षित राहणार आहे.
...तर देशभरात वापर शक्य
या पेटीतून औषधे देण्यासाठी तसेच व्हेंटिलेटर (जीवरक्षक प्रणाली) लावण्यासाठी व्यवस्था आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्याचा वापर देशभरात होण्याची शक्यता आहे. या पेटीमुळे वैद्यकीय सेवकांना संरक्षण मिळणार आहे.
एचएएलने सदरची पेटी एक्रॉलिक मेटलपासून बनविली असून त्याला एक कॅबिनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या कॅबिनेटमधूनच रुग्णावर उपचार करता येणार आहे. बॉक्समुळे कोरोना संसर्गापासून सहजपणे बचाव करता येणार आहे. एचएएलने सामाजिक दायित्वातून आणखी बॉक्स महापालिकेसह जिल्हा रुग्णालयाला दिले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक बॉक्स सुपूर्द करण्यात आला आहे.