पडळकर यांनी सोलापूर येथे बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर सडकून टीका केली होती. ते परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याने गाडीचे नुकसान झाले. हल्ल्यात ते स्वत: बचावले. या भ्याड हल्ल्याचा सिन्नरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, ज्येष्ठ नेते सुभाष कर्पे, जयंत आव्हाड, जिल्हा ओबीसीचे अध्यक्ष मनोज शिरसाठ, राजेश कपूर, महेश गुजराथी, पांडुरंग पाटोळे, उपतालुकाध्यक्ष रूपाली काळे, युवा मोर्चाचे सचिन गोळेसर, प्रमोद उगले, संगीता आव्हाड, विनोद अंबोले, शरद जाधव, शिवाजी आव्हाड, गणेश क्षीरसागर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिन्नर : ०५ सिन्नर पडळकर
सिन्नर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना भाजपचे पदाधिकारी.
050721\05nsk_11_05072021_13.jpg
सिन्नर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी.