डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:23 AM2019-06-15T01:23:11+5:302019-06-15T01:25:56+5:30
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतानाच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.
नाशिक : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतानाच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.
वैद्यकीय व्यावसायिकांसोबतच रुग्णालयांमधील डॉक्टरांवर होणाºया हल्ल्यांमुळे हिंसाचार वाढत असून, कोलकात्यात डॉ. परिभा मुखर्जी अशाच हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर देशभरात डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनात नाशिकच्या आयएमएने सहभाग घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच देशभरातील सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याने नाशिकमधील डॉक्टरांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आल्याचे आयएमएचे अध्यक्ष प्रशांत देवरे यांनी सांगितले. समाज स्वास्थ्याच्या हिताच्या दृष्टीने वैद्यकीय व्यावसायिकांची आणि रुग्णालयांची सुरक्षितता जपणे हे सरकारचे कर्तव्य असून, इंडियन मेडिकल असोसिएशन अशारुग्णांच्या जीवितास धोका
केंद्र शासनाने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाºया हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी आयएमएने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे रुग्णालयातील अन्य रुग्णही वेठीस धरले जातात. तसेच रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीखाली असल्याने त्यांची कार्यक्षमताही खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रुग्ण दाखल करून घेण्यास पुढे येणार नाही. त्यातून रुग्णांच्या जीविताचा धोका निर्माण होऊ शकतो.