चीनच्या हल्ल्याचा मालेगाव, सटाणा, ओझरला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:12 PM2020-06-18T22:12:51+5:302020-06-19T00:18:46+5:30
मालेगाव : भारत-चीनच्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले. त्या सर्व शहिदांना येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी चीन हा फक्त भारताचाच नव्हे संपूर्ण विश्वाचा शत्रू झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : भारत-चीनच्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले. त्या सर्व शहिदांना येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी चीन हा फक्त भारताचाच नव्हे संपूर्ण विश्वाचा शत्रू झालेला आहे.
आपण प्रत्यक्ष सीमा रेषेवर जाऊन जरी युद्ध करू शकत नसलो तरी अप्रत्यक्ष चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून या युद्धात आपण चिनी अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो म्हणून आजपासून चीननिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी नितीन पोफले, रविष मारू, जगदीश गोºर्हे यांची भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष मदन गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष विवेक वारुले, कुशाभाऊ आहिरे, राजेंद्र शेलार, दिनेश साबणे, भरत बागुल, विजय भावसार, प्रकाश सुराणा, दीपक शिंदे, दुर्गेश कोते, विजय ऐथाल, युवराज मुन्ना आहिरे, दीपक जगताप, दिनेश अग्रवाल, राकेश शिंदे, जिभाऊ पाटील, सर्जेराव पवार, अभिषेक भावसार, श्रीकांत शेवाळे, किशोर गुप्ता, ललित चव्हाण, चेतन सूर्यवंशी, टूनम गायकवाड, पवन वारुळे, पवन पाटील, दर्शन गायकवाड, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.
सटाण्यात शहीदांना श्रद्धांजली
सटाणा : चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे वीस जवान
शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील ताहाराबाद नाक्यावर गुरुवारी (दि.१८) भाजपतर्फेचिनी ध्वज, चिनी
वस्तू व चीनच्या पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यानंतर शहीद जवानांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली येथील ताहाराबाद नाक्यावर आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे, श्यामकांत लोखंडे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नीलेश पाकळे, नगरसेवक काका सोनवणे, महेश सोनवणे, जीवन सोनवणे, रुपाली पंडित, सरोज चंद्रात्रे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, किरण नांद्रे, संदीप पवार, मंगेश खैरनार, निर्मला भदाणे आदी उपस्थित होते.पाटणे येथे लडाख सीमेजवळ चीनकडून भ्याड हल्ला झाला. त्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध म्हणून बसस्थानकाजवळ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या व चीनच्या राष्ट्रध्वजाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. पुष्पक पाटील, वैभव अहिरे, योगेश पाटील, दादू पगारे, यश खैरनार, महेश खैरनार, अमोल पगारे आदी युवकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मालेगाव येथे हातात चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकनारे संदेश घेऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सटाणा रोडवर ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत चार-चारच्या गटाने चीनचा धिक्कार करीत निषेध प्रदर्शन केले. ओझर : चायनाचा वाढता उपद्रव आणि केलेल्या हल्ल्यामुळे ओझर येथील शिवसेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. चायनाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्या बाजारातील चायना वस्तू न घेण्याचे आवाहन ओझर शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत चायना वस्तू जाळून त्याचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांनीदेखील भारतात निर्मिती करण्यात अलेल्याच वस्तू विक्ती कराव्यात असे आवाहन प्रकाश महाले, नितीन काळे, प्रकाश कडाळे, प्रशांत पगार, वसंत भडके, स्वप्निल कदम, अनिल सोमसे, दीपक सोनार, आशिष शिंदे यांनी केले आहे.