‘त्या’ पुस्तकाच्या विरोधात आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:12 AM2020-01-14T00:12:09+5:302020-01-14T01:37:51+5:30
‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पुस्तकाचे लेखक गोयल यांचे छायाचित्र फाडून तीव्र आंदोलन केले. यावेळी हेमलता पाटील, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (दि.१३) सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
नाशिक : ‘आज काशिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याप्रकरणी नाशिक शहरातदेखील विरोध करण्यात आला. अनेक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली तर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने पुस्तकाचे लेखक गोयल यांचे छायाचित्र फाडून तीव्र आंदोलन केले. यावेळी हेमलता पाटील, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारी (दि.१३) सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
प्र्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले. यावेळी या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, शहरप्रमुख श्याम गोसावी, वैभव देशमुख, विनायक येवले, ललित पवार, प्रकाश कुमावत, सुभाष जगताप, सचिन अमृतकर व पदाधिकारी उपस्थित होते.