दिवाळीत औद्योगिक परिसरात सुरक्षा पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:39 AM2018-10-23T00:39:35+5:302018-10-23T00:39:40+5:30
अंबड, सातपूर औद्योगिक परिसरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
सिडको : अंबड, सातपूर औद्योगिक परिसरात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीत ५ ते १२ नोव्हेबर या दिवाळीच्या दिवसांत घ्यावयाची सुरक्षा व काळजी या विषयावर आयमाने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये उपस्थितांनी आपापल्या समस्या व सूचना मांडल्यात. औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमणे, पोलीस गस्त वाढविणे, कर्मचाऱ्यांना पगाराची रक्कम रोख न देता बॅँकेत वर्ग करणे, कारखान्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, पथदीप दुरुस्त करणे, लोखंडी जाळ्या बसविणे, दिवस व रात्रीची गस्त करणे, कोम्बिंग आॅपरेशन राबविणे, वाहनांची नाकाबंदी करणे, वाहन तपासणी करणे, उघड्यावर मद्य पिणाºयावर कारवाई करणे, बीट मार्शल नेमणे आदी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत आयमा अध्यक्ष वरुण तलवार, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, सातपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, निखिल पाचाळ, ललित बूब, विनायक मोरे, राजेंद्र अहिरे, राधाकृष्ण नाईकवाडे आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी सातपूर, अंबड परिसरातील उद्योजक, उद्योग संघटना, लेबर कॉन्ट्रॅक्टर, सुरक्षा संस्था उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अहिरे तर आभार ललित बूब यांनी केले.