जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवल्यात जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:46 PM2019-03-27T17:46:33+5:302019-03-27T17:48:36+5:30

येवला : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवला ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.

Public awareness rally in Yeola on the occasion of World Tuberculosis | जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवल्यात जनजागृती रॅली

जनजागृती रॅलीत मार्गदर्शन करताना क्षयरोग पथकाचे नितीन पवार समवेत उपस्थित मान्यवर.

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात दररोज ४० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.

येवला : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त येवला ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.
सकाळी ९.३० वाजता ग्रामीण रु ग्णालयातून वैद्यकीय अधिकारी नितीन जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रॅलीची सुरु वात झाली. या रॅलीची सुरु वात ग्रामीण रु ग्णालयापासून झाली. फत्तेबुरु ज नाका, गंगादरवाजा, काळामारु ती रोड, महाराणा प्रताप पुतळा, सराफ फाटा, मेनरोड, या मार्गाने विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.
रॅलीत क्षयमुक्त जगासाठी शिलेदार होऊया, सर मिळून नवा इतिहास घडवूया या घोषवाक्यासह क्षय रोगाची कारणे लिहिलेली फलक शहर वासियांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी आरोग्यसेवक व्ही.सी. पैठणकर यांनी क्षयरु ग्णांनी नियमित उपचार घ्यावा, खोकताना, शिंकताना रु माल लावावा, इतरत्र कोठेही थुंकू नये असे सांगितले. तर नितीन पवार यांनी सांगितले कि देशात दररोज ४० हजार व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. ५ हजार व्यक्तींना क्षयरोग होतो. त्यापैकी १ हजाराहून अधिक व्यक्ती क्षयरोगाने मृत्युमुखी पडतात. परंतु क्षयरोग हा आजार पूर्णता बरा होतो. जागतिक आरोग्य संघटनेचे क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तसेच दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस खोकला, संध्याकाळी तप, छातीत दुखणे, दाम लागणे, रात्री घाम येणे, भूक मंदावणे, थकवा येणे यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. शासकीय व काही खाजगी संस्थामध्ये क्षयरोगावर संपूर्णपणे मोफत उपचार केला जातो. त्याचा रु ग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. पंकज पाटील व डॉ. प्रवीण वेदपाठक यांनी केले.
रॅलीत एस. एन. डी. व येवला निर्संग स्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, सह शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.

कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी क्षयरोग पथकाचे भगवान काकड, डॉ. जितेंद्र पवार, देवेद्र गोफणे, अंकुश शिंदे, विश्वजित परदेशी, प्रा. आशा सोनवणे, सुधाकर भूसारा, ओंकार बन्सवाल, मयुरी बत्तीसे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नितीन पवार यांनी केले.

(फोटो २७ येवला)

Web Title: Public awareness rally in Yeola on the occasion of World Tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.