त्र्यंबकेश्वर : पारंपारिक भाषा टिकविणे ही आज काळाची गरज आहे. बोलीभाषा टिकविणे व ती जतन करणे ही काळाची गरज असून ग्रामिण भागातील भाषाशैली अखंडपणे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच आदिवासी भागातील भाषा, कला, कौशल्य आणि त्या भाषेतील रुबाबदार आणि निघणारे वेगवेगळे अर्थ, शब्दकोष जतन करण्यासाठी हे पुस्तक तरुणांनी संग्रही ठेवावे, असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख लिखित ह्यकोकणा आदिवासींचे लोकसाहित्यह्ण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तालुक्यातील हरसूल येथे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत उत्साहात संपन्न झाला. यावेळी विनायक माळेकर, माजी सभापती मनोहर चौधरी, रानकवी तुकाराम धांडे, जि.प.सदस्य रुपांजली माळेकर, माजी सभापती भिवा महाले, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती रवींद्र भोये, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, देविदास जाधव, मनोहर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक कादंबरीकार तुकाराम चौधरी यांनी केले. यावेळी उपस्थित कवी रवी बुधर, किशोर डोके, मधुकर भोये, मनोज कामडी, भास्कर डोके, संजय दोबाडे, काळूदास कनोजे, डॉ. माधव गावीत, देवदत्त चौधरी, संजय कामडी यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बारगजे, प्रा.विठ्ठल मौळे यांनी केले.
कोकणा आदिवासींचे लोकसाहित्य पुस्तकाचे हरसुल येथे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 11:32 PM
त्र्यंबकेश्वर : पारंपारिक भाषा टिकविणे ही आज काळाची गरज आहे. बोलीभाषा टिकविणे व ती जतन करणे ही काळाची गरज असून ग्रामिण भागातील भाषाशैली अखंडपणे जतन करणे महत्वाचे आहे. तसेच आदिवासी भागातील भाषा, कला, कौशल्य आणि त्या भाषेतील रुबाबदार आणि निघणारे वेगवेगळे अर्थ, शब्दकोष जतन करण्यासाठी हे पुस्तक तरुणांनी संग्रही ठेवावे, असे आवाहन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
ठळक मुद्देहिरामण खोसकर ; पारंपारिक भाषा टिकविणे काळाची गरज