डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 06:14 PM2020-08-26T18:14:19+5:302020-08-26T18:16:11+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात डाळींब पिकाचे तेल्या, टिपका यासारख्या रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब कवडीमोल भावात विकणे भाग पडल्याने उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी पाथ्लृरे खुर्द परिरातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केली.

पाथरे खुर्द येथील श्री सिद्धिविनायक मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी खासदार गोडसे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
भोजपूर धरणाच्या पाण्याचा पाथरे परिसरातील शेतकर्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज लाईटची व्यवस्था करणे, समृद्धी महामार्गावर दळणवळणासाठी अडचणी येत असणार्या शेतकर्यांसाठी छोटे पूल व बायपास करणे, पाथ्लृरे खुर्द सभामंडप बांधणे तसेच कोळगावमाळ येथ्लृील 10-15 दिवसांपासून पाच ट्रान्सफॉर्मर बंद असून ते तत्काळ चालू करावे, अशी मागणी शेतकर्यांनी केली. यावर नुकसान झालेल्या डाळिंब पिकांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार, कृषी अधिकार्यांना खासदार गोडसे यांनी दिल्या. तसेच पाटबंधारे विभाग, वीज वितरण व इतर विभागातील संबंधित अधिकार्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. ग्रामस्थ्लृांनी मांडलेल्या प्रश्नांवर तत्काळ निवारण केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.