मनपाची सिडकोत एक लाखाची दंडात्मक कारवाई.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:15 AM2021-03-28T04:15:07+5:302021-03-28T04:15:07+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार व रविवारी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार व रविवारी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शनिवारी सिडको, पाथर्डी फाटा परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अनेक दुकाने खुलेआम सुरू होती. यातील काही दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. अशा दुकानांवर मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने प्रत्येकी ५ हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त खाडे, विभागीय अधिकार डॉ. मयूर पाटील, स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह आरोग्य, उदयान विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.
अशी केली कारवाई
मास्क न वापरणारे १०९, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर -८, गर्दी झालेले दुकाने- ९, सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे-३, लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.