त्र्यंबेकश्वर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 05:40 PM2018-09-27T17:40:46+5:302018-09-27T17:41:08+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : हरसूलमध्ये विकास आघाडीला यश

 Push for proposers in Trimbakeshwar taluka | त्र्यंबेकश्वर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

त्र्यंबेकश्वर तालुक्यात प्रस्थापितांना धक्का

Next
ठळक मुद्देनिवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील सापगाव, वायघोळपाडा आणि हरसुल या तीन ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरु वारी (दि.२७) जाहीर करण्यात आला. निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत युवकांच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. यात महत्वाची ग्राम पंचायत असलेल्या हरसूल येथे पक्षीय राजकारण दूर ठेऊन हरसुल शहर विकास आघाडी नावाने एकत्र आलेल्या सर्वपक्षीय पॅनलला घवघवीत यश मिळाले असून सविता गावित यांची सरपंच पदी निवड झाली आहे तर आघाडीचे ८ सदस्य निवडून येत एक हाती सत्ता प्राप्त झाली आहे.
सापगाव येथे भाजपाच्या आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष सोमनाथ दिवे यांच्या मातोश्री भागाबाई दिवे यांचा भारती दिवे यांनी पराभव केला. सापगाव सरपंचपदाच्या उमेदवार भागाबाई दिवे यांना ३२४ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये हिरामण दिवे हे विजयी घोषित करण्यात आले. उर्वरीत जागा बिनविरोध झाल्या होत्या. वायघोळ पाडा येथे पुष्पा सुरेश झोले यांची सरपंच पदी निवड झाली आहे. त्यांना ३०९ मते मिळाली तर आनंदीबाई महाले यांना ६४ तर माया महाले यांना २५९ मते मिळाली. प्रभाग क्र मांक ३ मध्ये रघुनाथ पोटींदे १५४ मते मिळवून विजयी झाले. कृष्णा चौधरी यांना ६८ मते मिळाली. हरसूल येथे मतदारांनी नवोदित उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे निकालावरु न दिसुन येते. सकाळी १० वाजे पासुन मत मोजणीस सुरु वात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. निवड जाहीर होतांच समर्थकांनी गुलालाची उधळण करु न जल्लोष साजरा केला.

Web Title:  Push for proposers in Trimbakeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.