भारत विकास परिषदेतर्फे ‘भारत को जानोे’ प्रश्नमंजूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:36 AM2019-09-23T00:36:24+5:302019-09-23T00:36:53+5:30
भारत विकास परिषदेतर्फे संस्कार या आयमाअंतर्गत आपल्या देशाची सर्वांगीण माहिती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थी ‘भारत को जानो’ या नावाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : भारत विकास परिषदेतर्फे संस्कार या आयमाअंतर्गत आपल्या देशाची सर्वांगीण माहिती होण्यासाठी शाळेतील विद्यार्थी ‘भारत को जानो’ या नावाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंजे इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विविध २१ शाळांच्या वरिष्ठ व कनिष्ठ अशा ४० गटांचा स्पर्धेत सहभाग होता. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत कारगिल युद्धात शौर्यचक्र पुरस्काराने गौरविलेले अर्जुन सानप यांचा सत्कार बापू जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. उद्योजक मारवा, प्रा. वाघ व सुबोध मिश्रा यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत प्रथम क्र मांक वरिष्ठ गट रंगूबाई जुन्नरे शाळा, दुसरा क्र मांक भोसला मिलिटरी स्कूल, सी.डी.ओ.मेरी हायस्कूल यांनी विजय मिळविला. तसेच कनिष्ठ गटात प्रथम क्र मांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दुसरा क्र मांक विद्या प्रबोधिनी प्रशाला, तिसरा क्र मांक फ्रावशी अकॅडमी यांनी मिळविला. स्पर्धेचे सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी केले. यावेळी भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री जोशी, सचिव हेमंत गोखले, सीमा देशपांडे, मनीषा लगड, मिलिंद खांडेकर, द्वारकाप्रसाद तिवारी, अरविंद देशपांडे, शशिकांत देशपांडे आदी उपस्थित होते.