हरिहर गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 10:50 PM2020-11-30T22:50:02+5:302020-12-01T00:59:13+5:30

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.

The question of safety of tourists going to Harihar fort is on the agenda! | हरिहर गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

हरिहर गडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Next
ठळक मुद्देओव्हर कॉन्फीडेन्शनमुळे लोक जिवानिशी जातात.

त्र्यंबकेश्वर : मागील वर्षी झालेली चेंगराचेंगरी व एका महिलेचा पाय घसरून पडल्याने झालेला दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने पर्यटनस्थळे खुली करून अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांना परवानगी दिली आहे. पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच आहे.

हरिहर किल्ला हा इतर किल्ल्यांच्या तुलनेत आगळावेगळा किल्ला असून, गडावर चढण्यासाठी करण्यात आलेल्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. या अनोख्या पायऱ्यांसाठीही हा हर्षगड प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून उंची ११२० मीटर्स आहे. हा गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते ग्रामपंचायत हद्दीतील हर्षवाडी गावाजवळ हा किल्ला आहे.
हर्षगडाच्या परिसरातील गावे टाके हर्ष अस्वली हर्ष ही गावे आहेत. गडाच्या पायऱ्यांवर एकावेळी एकच माणूस चढू अगर उतरू शकतो. म्हणूनच हा गड चढण्यास अगर उतरण्यास धोकादायक आहे. काही महिन्यांपूर्वी गडावर पर्यटकांची गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची वेळ आली होती. त्यातच लॉकडाऊन लावल्याने पर्यटकांची गर्दी नको म्हणून पर्यटकांना गडावर जाण्यास मनाई करण्यात आली. तेथे वनरक्षक नियुक्त करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता पर्यटकांना जरी मोकळीक असली तरी सध्या संभाव्य कोरोनाची दुसरी लाट येऊ पाहते आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय सेल्फी काढणे वगैरेचा सोस वाढतो आहे. ओव्हर कॉन्फीडेन्शनमुळे लोक जिवानिशी जातात. याच कारणामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. नव्हे त्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

Web Title: The question of safety of tourists going to Harihar fort is on the agenda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.