स्मार्ट सिटीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:38 PM2020-02-19T18:38:43+5:302020-02-19T18:41:38+5:30
नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये रोष कायम आहे. त्यातच कंपनीने येत्या १ फेबु्रवारीपासून शहरात स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला. कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी तर या कंपनीला टाळे लावा नाही तर नाशिक महापलिकेला टाळे लावावे लागेल असा इशारा दिला.
नाशिक-स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबद्दल नगरसेवकांमध्ये रोष कायम आहे. त्यातच कंपनीने येत्या १ फेबु्रवारीपासून शहरात स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे मंगळवारी (दि.१९) झालेल्या सभेत संताप व्यक्त करण्यात आला. कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी तर या कंपनीला टाळे लावा नाही तर नाशिक महापलिकेला टाळे लावावे लागेल असा इशारा दिला.
स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत संचालकांना देखील पुरेशी माहिती नसते तेथे समान्य नगरसेवक तर दूरच असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. मंगळवारी (दि.१९) महासभेत प्रशासनाच्या मनमानी कारभारावर टीका होत असताना कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या मनमानीचा प्रश्न उपस्थित केला. कंपनीच्या वतीने शहरातील दुकानांच्या समोरील रस्त्यावर पट्टे मारले असून त्याठिकाणी वाहने उभी केल्यास शुल्क आकारले जाणार आहे. कोणालाही काहीही माहिती नसतना आता १ मार्च पासून सशुल्क पार्कींग सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी कंपनी काय करते हे कोणालाही माहिती नसून त्यांच्या कारभारातील गोंधळ बघता या कंपनीला टाळे लावण्याची गरज आहे अन्यथा नाशिक महापालिकेला टाळे ठोकावे लागेल असेही डॉ पाटील यांनी सांगितले. त्यांच्या मागणीला अनेक नगरसेवकांनी दाद देत स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराबाबत विशेष सभा घेण्याची मागणी केली. महापौरांनीही तसे आश्वासन दिले.