जलसंपदा विभागाच्या जागेबाबत त्वरित निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:59 AM2018-04-16T00:59:18+5:302018-04-16T00:59:18+5:30

येवला : सेनापती तात्या टोपे यांचे नियोजित साडेदहा कोटी रुपयांच्या स्मारकाच्या जागाबदलासह नवनिर्माणाबाबतचा निर्णय तत्काळ घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले.

Quick decision about the water resources department's land | जलसंपदा विभागाच्या जागेबाबत त्वरित निर्णय

जलसंपदा विभागाच्या जागेबाबत त्वरित निर्णय

Next
ठळक मुद्देगिरीष महाजन : तात्या टोपे स्मारक समितीच्या शिष्टमंडळाची भेटपालकमंत्री यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले

येवला : सेनापती तात्या टोपे यांचे नियोजित साडेदहा कोटी रुपयांच्या स्मारकाच्या जागाबदलासह नवनिर्माणाबाबतचा निर्णय तत्काळ घेण्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले.
सेनापती तात्या टोपे स्मारक नवनिर्माण समितीच्या १४ सदस्यीय शिष्टमंडळाने पालकमंत्री नामदार गिरीष महाजन यांची मुंबई येथे शिवनेरी निवासस्थानी रविवारी दुपारी भेट घेतली. या भेटीत समिती अध्यक्ष आनंद शिंदे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, डॉ. किशोर पहिलवान यांनी सेनापती तात्या टोपे यांचे स्मारक येवला-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या ८ एकर ३५ गुंठे जागेत व्हावे, अशी मागणी करीत संबंधित जागेचा नकाशा दाखवत माहिती दिली. या नियोजित स्मारकासाठी पालिकेने ठराव केलेली साठवण तलावालगतची जागा वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागणार असल्याचे मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले.
शिष्टमंडळात समिती अध्यक्ष आनंद शिंदे, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, डॉ किशोर पहिलवान, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, श्रावण जावळे, राजेंद्र मोहरे, संजय सोमसे, आदर्श बाकळे, बडाअण्णा शिंदे, मीननाथ पवार, सागर नाईकवाडे, श्रीकांत खंदारे, मयूर मेघराज यांचा समावेश होता.माहिती तयार ठेवण्याच्या सूचनासाठवण तलावालगतची जागा पर्यटकांसह येवलेकरांना कशी अयोग्य वाटते, यावर समितीने भूमिका स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली. सेनापती तात्या टोपे स्मारकाबाबतची सर्व माहिती तयार ठेवण्यास सांगितले. चर्चेत हा विषय लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगून पालकमंत्री यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

Web Title: Quick decision about the water resources department's land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.