नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर विद्यमान सरकारकडून अन्याय केला जात असल्याची तक्रार घेऊन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर ठाकरे यांनी भुजबळ यांच्याबाबतची आपली भूमिका योग्यवेळी जाहीर करू, असे मोघम आश्वासन दिले. मात्र भुजबळांवर खरोखर अन्याय झाला, की सत्तेच्या दुरुपयोगामुळे भुजबळांवर ही परिस्थिती ओढवली, असा सवाल ठाकरे यांनी शिष्टमंडळासमोर करताच उपस्थितांची दातखिळीच बसल्याचे वृत्त आहे.ओबीसींचे नेते छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवण्यात आले असून, त्यासाठी कायदेशीर तरतुदीदेखील झिडकारण्यात आले आहेत. राजकीय सूडबुद्धीने सदरची कारवाई केली जात असल्याने सर्वपक्षियांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सध्या भुजबळ समर्थकांकडून ‘अन्याय पे चर्चा’ घडवून आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी सकाळी १० वाजता नाशिक जिल्ह्णातील प्रमुख भुजबळ समर्थकांनी मुंबईत राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर हजेरी लावली. ठाकरे यांच्या पुढ्यात छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर राज्य सरकारकडून कशाप्रकारे अन्याय केला जात असल्याच्या पाढा अनेकांनी वाचला. तसेच त्यांच्या समर्थनार्थ जनतेचा मिळत असलेल्या प्रतिसादाचीही माहिती दिली. सर्वाेच्च न्यायालयाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाबाबतचे कलम ४५ रद्दबातल ठरवूनही न्यायालयाकडून जामीन नाकारण्याची कृती राजकीय सुडबुद्धीने असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. राज ठाकरे यांनी प्रारंभीच या साºया विषयात ‘राजकारण सुरू असल्याचे’ सांगत उपस्थितांच्या सुरात सूर मिसळविला व याबाबत आपली भूमिका जाहीर सभेत किंवा स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याचे आश्वासन दिले. ठाकरे यांना भेटीसाठी जवळपास २५ ते ३० जणांचे शिष्टमंडळ गेले असल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ठाकरे यांनी निवडक प्रमुख पदाधिकाºयांशी स्वतंत्र चर्चा करण्याचे ठरविले व त्यांनतर पुन्हा दुसरी बैठक घेण्यात आल्याचे मनसेच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.मोठ्यांबद्दल सहानुभूती, समीरविषयी रागनिवडक पदाधिकाºयांसोबत बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करून सर्वांनाच निरुत्तर केले. छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला की त्यांच्या कृत्यामुळे त्यांना कारागृहात जावे लागले, असा सवाल करून ठाकरे यांनी केला. छगन भुजबळ यांच्याविषयी ठाकरे यांनी सहानुभूती दर्शविताना समीरविषयी मात्र आपला राग व्यक्त केला व त्याच्यामुळे मोठ्या भुजबळ यांना त्रास झाल्याची भावनाही बोलून दाखविली. आपण स्वत: भुजबळ यांना या साºया गोष्टींविषयी अगोदरच अवगत केले होते व सावध राहण्याविषयी विनंती केली होती, असेही ठाकरे यांनी उपस्थिताना सांगितले. सध्याचे सरकार सूडबुद्धीने वागतही असेल; परंतु आता साºया गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे काय करता येऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. ठाकरे यांनी सुनावलेले ‘खडे बोल’ ऐकून उपस्थितांनी मौन पाळणेच पसंत केले. या बैठकीस आमदार जयंत जाधव, नरहरी झिरवाळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, शिरीष कोतवाल, डॉ. कैलास कमोद, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शरद अहेर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भुजबळांच्या अन्यायांवर राज ठाकरेेंचे ‘मौन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:14 AM
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर विद्यमान सरकारकडून अन्याय केला जात असल्याची तक्रार घेऊन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या सर्वपक्षीय भुजबळ समर्थकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर ठाकरे यांनी भुजबळ यांच्याबाबतची आपली भूमिका योग्यवेळी जाहीर करू, असे मोघम आश्वासन दिले. मात्र भुजबळांवर खरोखर अन्याय झाला, की सत्तेच्या दुरुपयोगामुळे भुजबळांवर ही परिस्थिती ओढवली, असा सवाल ठाकरे यांनी शिष्टमंडळासमोर करताच उपस्थितांची दातखिळीच बसल्याचे वृत्त आहे.
ठळक मुद्देअन्याय केला जात असल्याच्या पाढा अनेकांनी वाचला भुजबळ समर्थकांची स्वारी सोमवारी थेट कृष्णकुंजवर ठाकरेंची सरबत्ती : शिष्टमंडळाशी निरर्थक चर्चा