किसान सभेचा पेठ येथे मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:16 PM2019-02-12T17:16:30+5:302019-02-12T17:16:57+5:30

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.

 A rally in the farmer's meeting at Peth | किसान सभेचा पेठ येथे मेळावा

किसान सभेचा पेठ येथे मेळावा

Next
ठळक मुद्देमाकपाच्या किसान सभेची पेठ येथे आमदार जे. पी. गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून, वनजमिनी कायद्यानुसार सातबारा मिळाला नसल्याने दि. २० फेब्रूवारीपासून संपूर्ण आदिवासी जनता मुंबईला धडक देणार असल्याचे गावित यांनी सांगित

पेठ : मागील वर्षी नाशिक ते मुंबई पायी प्रवास करून मंत्रालय गाठणाऱ्या कॉम्रेडच्या मोर्चाने शासनाने सर्व मागण्या मंजूर करून आश्वासनाने वेळ मारून नेली; मात्र यातली एकही मागणी पूर्णत्वास न गेल्याने किसान सभेने सरकारवर अविश्वास दाखवित पुन्हा एकदा मुंबईवर धडकणार असल्याचे मत येथील किसान सभेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आले.

केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाला विरोध करताना नार-पार, झरी, दमणगंगा, एकदरे आदी प्रकल्प राबविताना स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रथम स्थानिकांना पाणी द्यावे त्याशिवाय प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र शासनाने प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख जमा करण्याचे गाजर दाखवून फसवल्याने आता या सरकारवर विश्वास न ठेवता किसान सभा आपल्या मागण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई गाठणार असल्याचे जाहीर केले. वीजबिल माफ करावे, वृद्धापकाळ पेन्शन वाढवून मिळावे, शिधापत्रिका मिळाव्यात, गुजरातला जाणारे पाणी अडवून स्थानिक शेतकºयांना लाभ मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष देवराम गायकवाड, दत्तू पाडवी, नामदेव मोहाडकर, जाकीर मनियार, दुर्गा चौधरी यांच्यासह किसान सभा सदस्य उपस्थित होते.
 
Web Title:  A rally in the farmer's meeting at Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.