संस्थांकडून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 01:44 AM2021-04-22T01:44:42+5:302021-04-22T01:45:03+5:30

राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने सर्व मठ, मंदिरे बंद करत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करून निर्बंध लादल्याने यावर्षी काळाराम मंदिर देवस्थानतर्फे बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

Ram Janmotsav program in the presence of few devotees from the organization | संस्थांकडून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव कार्यक्रम

संस्थांकडून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव कार्यक्रम

Next

पंचवटी : राज्यातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शासनाने सर्व मठ, मंदिरे बंद करत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करून निर्बंध लादल्याने यावर्षी काळाराम मंदिर देवस्थानतर्फे बुधवारी दुपारी अगदी साध्या पध्दतीने कोरोना नियम पालन करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 
राम नवमी निमित्त बुधवारी (दि. २१) काळाराम मंदिरात पहाटे साडेपाच वाजता धनंजय पुजारी यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली, तर साडेसातला काळाराम मंदिराचे वंश परंपरागत पूजेचे मानकरी विलासबुवा पुजारी यांनी महापूजन केले. दुपारी बारा वाजता मंदिरात प्रभू रामचंद्राची प्रतिमा फुलांनी सजविलेल्या पाळण्यात ठेवून मंदिरात असलेले पारंपरिक वाद्य वाजवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामजन्म होताच पुजारी उपस्थित विश्वस्तांनी टाळ्या वाजवून गुलाल उधळण करत व मंदिरात पारंपरिक वाद्य वाजवून आनंदोत्सव साजरा केला. सायंकाळी देवाला अन्नकोट आणि आरती कार्यक्रम, रात्री नरेश बुवा पुजारी यांच्या हस्ते रामाची शेजारती करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशानुसार मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. राम नवमी निमित्ताने काळाराम मंदिर परिसरात व मुख्य मंदिर आवारात आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाला साजशुंगार करण्यात आला होता. परिसरात रांगोळी काढण्यात आली होती तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.कोरोचे संकट दूर करण्यासाठी देवाला साकडे
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात कोरोना महामारी संकट कोसळले असून, देशावर पसरलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर होऊन नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे. देशाची प्रगती होवो, हरित क्रांती घडावी तसेच भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी प्रभू रामाला साकडे घालण्यात आले.

Web Title: Ram Janmotsav program in the presence of few devotees from the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.