रेशनमाफियांना गजाआड करणार
By admin | Published: February 9, 2015 01:19 AM2015-02-09T01:19:59+5:302015-02-09T01:20:34+5:30
रेशनमाफियांना गजाआड करणार
नाशिक : गोरगरीब जनतेला दिल्या जाणाऱ्या रेशनचा काळाबाजार करणारे अनेक माफिया राज्यात तयार झाले असून, त्यांना लवकरच गजाआड केले जाईल, असे माहिती राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़ सुरगाणा येथे झालेला रेशनचा काळाबाजार जिल्हा प्रशासन व पोलिसांची कारवाई करण्याबाबतची टोलवाटोलवी याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तरे देत होत्या़ सुरगाणा येथे काही दिवसांपूर्वीच पाच कोटी रुपयांच्या रेशनचा काळाबाजार उघडकीस आला़ यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी हे पोलिसांकडे बोट दाखवितात तर पोलीस आमच्यापर्यंत अद्याप या धान्याच्या काळाबाजाराची कागदपत्रेच पोहोचली नसल्याचे सांगून टोलवाटोलवी करतात़ यावर मुंडे यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जीपीएस सिस्टीम, बायोमॅट्रीक्सचा वापर, घरपोच धान्य असे उपक्रम राबविले जाणार असून, माफियांना बहुतांशी आळा बसणार आहे़ नाशिक जिल्'ाच्या आदिवासी भागातील कुपोषण, अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न, रिक्तपदे याबाबत आढावा घेऊन येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे़ संपूर्ण राज्यभरात बीडीओंची मोठ्या संख्यने पदे रिक्त असून, ती दोन महिन्यात भरणे शक्य नाही़ त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पदोन्नती याद्वारे लवकरच ही पदे भरली जाणार आहेत़ अपंगांसाठीच निधी तसेच त्यांच्या उपजीविकेच्या साधनांबाबत बोलताना मुंडे यांनी अपंगांना चरितार्थाचे साधन मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले़