दिंडोरी : आगामी काळात पक्ष संघटना मजबुतीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी जनतेत जाऊन लोकहिताची कामे करावीत. यापुढे महिलांचेही संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला मेळाव्यात बोलताना केले. यावेळी चाकणकर यांनी भाजपवरही टीका केली.दिंडोरी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे होत्या. चाकणकर यांनी सांगितले, ज्या प्रमाणे आपण आपले कुटुंब सांभाळतो, त्याप्रमाणे पक्ष हेही आपले कुटूंबच आहे. त्यामुळेच राज्य पातळीवर शहरात काम करण्याबरोबरच ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. यावेळी रु पाली चाकणकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, तालुकाध्यक्ष संगिता राऊत तसेच भास्कर भगरे यांनी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी नरेश देशमुख, पेठ तालुकाध्यक्ष पुनम गवळी, दिंडोरीच्या नगरसेविका शैला उफाडे, मिना पठाण, कविता पगारे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, माजी जि.प.उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा रचना जाधव, माजी जि.प.सदस्या संगिता ढगे, सपना पगार, सुनिता भरसठ, वंदना बर्डे, प्रभावती पवार, यशोदा राऊत, मिरा भरसठ, राजेद्र ढगे, कृष्णा मातेरे, शाम हिरे, भाऊसाहेब पाटील, विजय देशमुख, डॉ.गटकळ, किशोर विधाते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन डॉ.योगेश गोसावी यांनी केले. आभार तौसिफ मनियार यांनी मानले.
दिंडोरीत राष्ट्रवादीचा महिला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 6:31 PM
चाकणकरांची उपस्थिती : भाजपवर टीकास्त्र
ठळक मुद्देसामान्य कार्यकर्त्यांपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.