लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/जानोरी :दूध दरात वाढ करावी व दूध व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथे धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.गेल्या काही महिन्यांपासून दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या असून, कोरोनामुळे दुधाचे घसरलेलेल्या दरामुळे आंदोलन करण्यात आले. दुधाला प्रतिलिटर दहा रु पये अनुदान मिळालेच पाहिजे, जनता उपाशी सरकार तुपाशी, अशा घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनप्रसंगी प्रवीण अलई, नरेंद्र जाधव, योगेश तिडके, बापूसाहेब पाटील, बच्छाव, भागवत बोरस्ते, नितीन गायकर, नितीन जाधव, दीपक श्रीखंडे, तुकाराम जोंधळे, योगेश चौधरी, शंकराव वाघ, उत्तमराव ढिकले, नामदेवराव ढिकले आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी जिल्ह्यात रास्ता राको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 11:10 PM
दिंडोरी/जानोरी :दूध दरात वाढ करावी व दूध व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथे धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ठळक मुद्देमहाएल्गार । वाहनांच्या लांबच लांब रांगा; शासनाविरोधात घोषणाबाजी