धान्य वितरण थांबवले : रेशन दुकानदारांनी संप केला प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:27 PM2020-06-06T17:27:56+5:302020-06-06T17:29:00+5:30

राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेशन दुकानातून धान्य वाटप करणाऱ्या पाच दुकानदाराचा संसर्गाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे रेशन दुकांदारांनाही सरकारी यंत्रने प्रमाणे विम्याचे सरंक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मे महिन्याच्या अखेरीस दुकानदारांनी संप पुकारला

Ration shopkeepers strike effective | धान्य वितरण थांबवले : रेशन दुकानदारांनी संप केला प्रभावी

धान्य वितरण थांबवले : रेशन दुकानदारांनी संप केला प्रभावी

googlenewsNext
ठळक मुद्देपोस मशीनचा वापर पूर्णपणे बंद

नाशिक : कोरोनाच्या संकटात उदर निर्वाहाची चिंता लागून असलेल्या गोर गरिबांना रेशन मधून मे महिन्याचे धान्य वितरण करण्याची शासनाने दिलेली अनुमती संपुष्टात येताच शनिवार पासून रेशन दुकानदारांनी आपला संप प्रभावी केला असून, पोस मशीनचा वापर पूर्णपणे बंद करून धान्य वितरण थांबवले आहे.
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेशन दुकानातून धान्य वाटप करणाऱ्या पाच दुकानदाराचा संसर्गाने मृत्यू झाला आहे, त्यामुळे रेशन दुकांदारांनाही सरकारी यंत्रने प्रमाणे विम्याचे सरंक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मे महिन्याच्या अखेरीस दुकानदारांनी संप पुकारला आहे, मात्र त्यांच्या कडे पडून असलेले मे महिन्याचे धान्य त्यांनी 5 जून पर्यंत वाटप करावे अशा शासनाच्या सूचना असल्याने ज्या दुकानदाराकडे माल शिल्लक होता त्यांनी शुक्रवार पर्यंत वाटप केला. जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी चलन न भरण्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला होता, त्यानुसार कोणी चलन भरले नाही, उलट शनिवार ( दि 6) पासून पोस मशीन बंद करून धान्य वितरण बंद करून सरकारवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 2600 दुकानातून धान्य वाटप होऊ शकले नाही असा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान, दुकानदारांनी धान्य उचलण्यास नकार दिला असला तरी, पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांच्या दाराशी जाऊन धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत दुकानदार काय निर्णय घेतात या कडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Web Title: Ration shopkeepers strike effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.