येवला : येवला व अंदरसूल येथील बाजार आवारात गेल्या सप्ताहात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभावात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण झाली. कांद्यास देशांतर्गत परदेशात चांगली मागणी होती. सप्ताहात कांद्याची ४९५३९ क्विंटल इतकी आवक झाली. बाजारभाव किमान १५०० ते ३१५०, तर सरासरी रु. २७०० प्रतिक्विंटल होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची ३५३४५ क्विंटलएवढी आवक झाली. बाजारभाव किमान १५०० ते कमाल ३००१ होते, तर सरासरी २७०० रुपये प्रतिक्विंटल असे होते.गव्हाच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव किमान १६११ ते कमाल रु. १८९० होते, तर सरासरी १७३५ रुपयांपर्यंत होते. मका पिकाची एकूण १०३९७ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १०८०, कमाल १२०९ रुपये, तर सरासरी ११६० रुपये प्रतिक्विंटल होते. अंदरसूल येथे मक्याची एकूण ८०६ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १०५०, कमाल १२११ तर सरासरी ११६० रुपये प्रतिक्विंटल असे राहिले, अशी माहिती डी. सी. खैरनार यांनी दिली. गेल्या सप्ताहात बाजरीची एकूण ३८ क्विंटल आवक झाली असून, बाजारभाव किमान १०७१, कमाल १५०० रुपये, तर सरासरी रु. १२५५ पर्यंत होते. हरभरा पिकाची १० क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान ४१००, कमाल ५०००, तर सरासरी रु . ४४२५ भाव होता. मुगाची एकूण १० क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान ४२००, कमाल५३००, तर सरासरी रु . ४८०० प्रतिक्विंटल असे होते. सोयबीनची ८९ क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान २५०३, कमाल २९७५, तर सरासरी रु. २८७७ प्रतिक्विंटल होते.
लाल कांदा : येवला, अंदरसूल बाजार आवारात नाराजी आवक वाढल्याने भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:58 PM
येवला व अंदरसूल येथील बाजार आवारात गेल्या सप्ताहात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभावात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण झाली.
ठळक मुद्देगव्हास व्यापारी वर्गाची देशांतर्गत मागणीमका पिकाची १०३९७ क्विंटल आवक