नाशिक : रिफाइंड तेलामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, त्यामुळे वाढणारा हृदयविकाराचा धोका यामुळे अनेक नागरतक पुन्हा घाण्याच्या तेलाकडे वळू लागले असून, गेल्या काही दिवसांत शहर परिसरात तेल घाण्यांची संख्या वाढली आहे. रिफाइंड तेल आणि घाण्याचे तेल यातील घटकांमध्ये बराचसा फरक असून, अनेक डॉक्टरही घाण्याचे तेल सेवनाचा सल्ला देतात. मुळात तेल कमी खाल्लेले चांगले असते असे डॉक्टरांकडून सांगितले जात असते. जास्त तेलकट पदार्थांबरोबरच बाहेरचे पदार्थ खाणेही शरीरास अपायकारक असल्याने हे खाणे टाळलेलेच बरे असा सल्ला आहरतज्ज्ञ देत असतात.
चौकट-
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
तेलाच्या अतिवापरामुळे बॅड कॉलेस्ट्रॉल वाढत असते. यामुळे तेलाचा वापर कमीतकमी करणे आवश्यक आहे. नेहमी एकच तेल खाण्यापेक्षा प्रत्येकवेळी आलटून-पालटून तेल घेणे चांगले असते. हॉटेलांमध्ये बऱ्याचवेळा एकाच तेलात अनेक पदार्थ तळले जातात यामुळे ते शरीरास हानिकारक ठरतात. यासाठी बाहेरचे पदार्थ शक्यतो खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
चौकट-
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
पूर्वी शहरात तेलाचे लाकडी घाणे एक किंवा दोनच होते, मात्र गेल्या चार-पाच वर्षांत शहरातील घाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, सध्या शहरात २० ते २५ लाकडी घाणे आहेत. लाकडी घाण्याच्या तेलावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. यामुळे या तेलातील नैसर्गिक घटक टिकून राहतात. शरीरास आवश्यक असलेले अनेक घटक यातून मिळत असल्याने सध्या घाण्याच्या तेलाकडे लोक वळू लागले आहेत. कोविडच्या संकटामुळे मात्र सध्या ग्राहकांची संख्या स्थिर असल्यासारखी स्थिती असल्याचे चालकांनी सांगितले.
चौकट-
रिफाइंड तेल घातक का?
रिफाइंड तेलामुळे शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ते रक्तवाहिन्यांमध्ये साचून पुढे त्याचे ब्लॉकेज तयार होतात. यामुळे रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होऊन ह्यदयविकार, ब्रेन स्ट्रोक यासारखे आजार तर होतात, शिवाय किडन्यांवरही त्याचा परिणाम होत असतो. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे रिफाइंडतेल शरीरासाठी घातक ठरते.
चौकट-
आहारतज्ज्ञ काय म्हणतात? (आहारतज्ज्ञाचा कोट)