येवला : चांदवड नगरपरिषदेचे तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा बांधकाम विभागातील अभियंता शेषराव चौधरी यांचे विरूध्द माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याने ५ हजार रूपयांचा दंड करण्यात आलाअसून तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल सर्जेराव मर्ढेकर यांचे विरूध्द प्रथम अपिलावर सुनावणी घेवून निर्णय निर्गमीत कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी सदर आदेश पारीत केले आहेत. येवला येथील दिपक रंगनाथ काथवटे यांनी, तत्कालीन चांदवड नगरपरिषदेचे जन माहिती अधिकारी तथा नगरपरिषद बांधकाम विभागातील अभियंता शेषराव रामदास चौधरी यांचेकडे माहिती मागीतली होती. सदर माहिती न मिळाल्याने काथवटे यांनी तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांचेकडे प्रथम अपिल दाखल केले होते.प्रथम अपिलात मुदतीत सुनावणी न झाल्याने काथवटे यांनी नाशिक खंडपीठात अपिल दाखल केले होते. यावर सुनावणी दरम्यान, तत्कालीन बांधकाम अभियंता चौधरी व मुख्याधिकारी मर्ढेकर यांच्या खुलाश्यानंतर राज्य माहिती आयुक्त बिश्नोई यांनी आदेश पारीत करत प्रस्तुत अपील अंतिमत: निकाली काढले आहे.त्यांच्या विरूध्द माहिती अधिकारी अधिनियम २००५ चे कलम २० (१) नुसार रूपये ५ हजारचा दंड करण्यात आला. सदर दंडाची रक्कम मुख्याधिकारी, नगरपरिषद कार्यालय, चांदवड यांनी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा नगरपरिषद बांधकाम अभियंता चौधरी यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेशात म्हटले आहे.
माहिती पुरवण्यास टाळाटाळ ; अभियंत्याविरूध्द दंडाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 9:03 PM
येवला : चांदवड नगरपरिषदेचे तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा बांधकाम विभागातील अभियंता शेषराव चौधरी यांचे विरूध्द माहिती पुरवण्यास टाळाटाळ केल्याने ५ हजार रूपयांचा दंड करण्यात आलाअसून तत्कालीन प्रथम अपीलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी राहुल सर्जेराव मर्ढेकर यांचे विरूध्द प्रथम अपिलावर सुनावणी घेवून निर्णय निर्गमीत कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी सदर आदेश पारीत केले