पुणे - नाशिक रेल्वेमार्गासाठी पहिल्या खरेदीखताची नोंदणी : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 01:40 AM2022-05-05T01:40:07+5:302022-05-05T01:42:23+5:30

पुणे - नाशिक नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट नंबर ६७३चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदविले आहे. इतर भूधारकांनीही संमतीने सहा महिन्यात वाटाघाटी व सहमतीने खरेदीखत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Registration of first purchase deed for Pune-Nashik railway line | पुणे - नाशिक रेल्वेमार्गासाठी पहिल्या खरेदीखताची नोंदणी : जिल्हाधिकारी

पुणे - नाशिक रेल्वेमार्गासाठी पहिल्या खरेदीखताची नोंदणी : जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्देअन्य भूधारकांनाही केले आवाहन

नाशिक : पुणे - नाशिक नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांनी आपला गट नंबर ६७३चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्राचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदविले आहे. इतर भूधारकांनीही संमतीने सहा महिन्यात वाटाघाटी व सहमतीने खरेदीखत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

पत्रकात नमूद केल्यानुसार, पुणे - नाशिक दुहेरी मध्यम द्रुतगती ब्राॅडगेज लाइनच्या विद्युतीकरण व बांधकामासाठी प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी श्रीमती कमळाबाई कुऱ्हाडे यांच्या गट नंबर ६७३ चे ०.५९०० हेक्टर आर क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय समितीने एक कोटी एक लाख ८४ हजार ७६० रुपये मोबदला रक्कम निश्चित केली आहे. श्रीमती कुऱ्हाडे व महारेल व महसूल अधिकारी यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, सिन्नर येथे पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पाचे नाशिक जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदविण्यात आले आहे. या खरेदीखत नोंदविण्यासाठी पुढील सहा महिन्यांसाठी कालावधी निश्चित करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. तसेच पुणे - नाशिक रेल्वे प्रकल्पात जमीन संपादित होणाऱ्या इतर भूधारकांनीही वाटाघाटींतून थेट खरेदी करण्यास संमती देऊन खरेदीखत लवकरात लवकर नोंदविण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Web Title: Registration of first purchase deed for Pune-Nashik railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.