विविध वयोगटातील  २० बालकामगारांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:11 AM2018-06-12T01:11:26+5:302018-06-12T01:11:26+5:30

वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला २०१७-१८ या वर्षात विविध वयोगटातील आणि देशभरातील २० बालकांची सुटका करण्यात यश आले आहे.

 Release of 20 Child Workers of Various Ages | विविध वयोगटातील  २० बालकामगारांची मुक्तता

विविध वयोगटातील  २० बालकामगारांची मुक्तता

Next

नाशिक : वेगाने विकसित होत जाणाऱ्या नाशिक शहरात बालमजुरीची समस्याही पाहायला मिळत आहे. बालमजुरांची सुटका करून त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देणे, त्यांना त्यांचे बालपण उपभोगण्याची संधी देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणा-या ‘चाइल्ड लाइन’ संस्थेला २०१७-१८ या वर्षात विविध वयोगटातील आणि देशभरातील २० बालकांची सुटका करण्यात यश आले आहे. २०१४-१५ मध्ये सुवर्णकामासाठी दक्षिण भारतातून नाशकात आलेल्या ५७ बालमजुरांची सुटका करण्यात आली होती. येणाºया तक्रारींची दखल घेत जिल्हाभरातील बालमजुरांची सुटका, बालमजुरी कायद्याविषयी लोकांचे प्रबोधन करणे आदी कामे केली जात असून, गेल्या काही वर्षांत बालमजुरीचे प्रमाण आटोक्यात आणण्यात संस्थेला यश येत आहे. यासाठी समाजशास्त्र महाविद्यालय, नवजीवन वर्ल्ड पीस अ‍ॅँड रिसर्च फाउंडेशन, चाइल्ड लाइन या संस्थांअंतर्गत प्रा. विलास देशमुख, प्रणिता तपकिरे, महेंद्र विंचूरकर, प्रवीण अहेर, सुवर्णा वाघ, निखिल पाटील, शीतल वडनेरकर, दीपक शिंदे, विजया शिंदे, दमयंती बावनकुळे, अतुल डांगळे, त्रिशरण वनीस आदी व्यक्ती व संस्था कार्यरत आहेत.
...अन् बालकांची झाली सुटका
मूळ पश्चिम बंगाल येथील आणि आईवडिलांनी पैशांच्या बदल्यात ओझर येथे एका घरी कामाला ठेवलेल्या मुलीने टीव्हीवरील चाइल्ड लाइनची जाहिरात पाहून दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली स्थिती सांगितली. नाशिक चाइल्ड लाइनचे कार्यकर्ते तत्काळ तेथे पोहोचले व तिची सुटका केली. तिचे पालक आल्यानंतर त्यांचे समुपदेशन करीत, त्यांना समज देत मुलीला पश्चिम बंगालमध्ये तिच्या मूळ घरी पाठविण्यात आले. पश्चिम बंगालमधील चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनीही तिच्या केसचा पाठपुरावा करत तिचे संगोपन व्यवस्थित होत आहे ना याची वेळोवेळी चाचपणी केली. आज मुलगी व्यवस्थित शिकते आहे.
तक्रारीनंतर मुलीची सुटका
एका उच्चभ्रू मुलीला तिच्या आईवडिलांनी त्यांचेच नातेवाईक असणाºया नाशिकच्या कुटुंबात पाठवून दिले. मुलीला शिकवू, चांगले संस्कार करू असे आश्वासन दिल्याने आणि नातेवाईकच असल्याने पालकांनीही आनंदाने पाठविले. प्रत्यक्षात मुलीला त्या नातेवाईकांनी आपल्या चिमुकल्या बाळाला सांभाळण्याचे काम दिले. नातेवाईक दोघेही नोकरीसाठी सकाळी १० वाजता बाहेर पडत व सायंकाळी ६ वाजता घरी येत. तोपर्यंत घराला बाहेरून कुलूप लावले जात होते. चाइल्ड लाइनला आलेल्या तक्रारीनंतर मुलीची सुटका करण्यात आली.
मुलाची सुटका
दक्षिण भारतातील एका लहानग्या मुलाला त्याच्या नातेवाईकाने नाशिकला आणले होते. या नातवाईकाने लग्नात आर्थिक मदत केली होती. त्याच्या बदल्यात त्याला नाशिकला आणून इडल्या विकण्याच्या कामात गुंतवण्यात आले. मुलाला दररोज १५० रुपयांच्या इडल्या विकल्या तरच खायला मिळत होते. त्याची केस कळताच त्याच्या भाषेची व्यक्ती शोधत व सत्य परिस्थिती जाणून घेत त्याची सुटका करण्यात आली.
मातेने सोडले वाºयावर
एका छोट्या मुलीच्या आईने आपल्या मुलीला बेवारस सोडून ती प्रियकराबरोबर निघून गेली. त्या व्यक्तीने मुलीला घराच्या अंगणातील कोपºयात आसरा दिला; पण तिला खायला, प्यायलाही काही दिले जात नव्हते. तिच्याकडून घरकामे मात्र करून घेतली जात होती. तिची केस समजल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. आज ती मुलगी आधाराश्रमात राहून शिक्षण पूर्ण करत आहे.

Web Title:  Release of 20 Child Workers of Various Ages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक