...अन भिमवाडीतील तिघा पोपटांची मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:53 PM2020-04-28T17:53:12+5:302020-04-28T17:54:43+5:30

भिमवाडीमध्ये देखील काही नागरिकांनी भारतीय पोपट पाळलेले होते. शनिवारी (दि.26) जेव्हा या भागातील घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तेव्हा घटनास्थळी बचावकार्यासाठी हजर असलेल्या पोलिसांनी पोपटांचे पिंजरे भद्रकाली पोलीस ठाण्यात हलविले.

... release of three parrots from An Bhimwadi | ...अन भिमवाडीतील तिघा पोपटांची मुक्तता

...अन भिमवाडीतील तिघा पोपटांची मुक्तता

googlenewsNext
ठळक मुद्देअज्ञात इसमांनी अज्ञानापोटी पाळलेले होते

नाशिक : जुने नाशिक परिसरातील गंजमाळ या भागातील भिमवाडी सहकार नगर मधील काही अज्ञात नागरिकांनी पाळीव पक्षी म्हणून भारतीय पोपट पिंजरा कैद करून ठेवलेला होते. शनिवारी नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाने या भागातील तीन पोपटांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.

भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत पोपट पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे याबाबत वारंवार वन विभागाकडून जनजागृती करण्यात येते मात्र तरीदेखील बहुसंख्य नागरिक पहिल्यापासून पोपटाचे आकर्षणापोटी त्याला पिंजऱ्यात काहीच करून आपल्या घराच्या उंबरठ्यावर टांगतात परिणामी ही कृतींना कायद्याचे उल्लंघन करणारी ठरते. नागरिकांनी अशाप्रकारे पोपट पळू नये असे आवाहन वनविभागाकडून सातत्याने केले जात आहे मात्र तरीदेखील नागरिक याकडे दुर्लक्ष करतात.
अशाचप्रकारे भिमवाडीमध्ये देखील काही नागरिकांनी भारतीय पोपट पाळलेले होते. शनिवारी (दि.26) जेव्हा या भागातील घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली तेव्हा घटनास्थळी बचावकार्यासाठी हजर असलेल्या पोलिसांनी पोपटांचे पिंजरे भद्रकाली पोलीस ठाण्यात हलविले. दरम्यान काही नागरिकांनी त्यांचे पाळलेले पोपट देण्यास नकार दिला तर तीन पिंजरे मात्र पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले. याबाबत नाशिक पश्चिम वन विभागाला माहिती कळविण्यात आली माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी येऊन पोपटांचे पिंजरे ताब्यात घेतले कार्यालयात याबाबतची नोंद केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आल्याची माहिती भदाणे यांनी दिली आहे. दरम्यान पोपट पाळणे हा कायद्याचा भंग ठरतो त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारे पोपट पाळू नये असेही भदाणे यांनी सांगितले आहे येत्या काही दिवसांमध्ये जुने नाशिक पंचवटी सिडको अंबड नाशिक रोड या भागांमध्ये मोहीम राबवून पाळीव प्राण्यांची मुक्तता करण्याचे अभियान हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान जे नागरिक पोपट पाळताना आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचा इशाराही वन विभागाने दिला आहे भिमवाडी येथून ताब्यात घेतलेले तीन पोपट हे अज्ञात इसमांनी अज्ञानापोटी पाळलेले होते, अशी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: ... release of three parrots from An Bhimwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.