राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथे धार्मिक कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:06 PM2020-08-05T15:06:50+5:302020-08-05T15:07:43+5:30
जानोरी : नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील दिगंबर आखाडेशी संबंधित पुरातन काळातील राम मंदिरात आज अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिर पुजारी व ट्रस्टी बैरागी परिवार व जानोरीकर यांच्या वतीने सत्यनारायण पूजन करण्यात आले.

यावेळी कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत गावच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, पोलीस पाटील सुरेश घुमरे, माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच विष्णुपंत काठे, सदस्य अशोक केंग, भाजपाचे योगेश तिडके यांनी सकाळी सत्यनारायण पूजा व दर्शन घेतले.
त्यानंतर दुपारच्या वेळेत नाशिक जिल्ह्याच्या पोलीस ग्रामीण उपाधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, कळवण दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बोरसे, मोहाडी पोस्टचे अरु ण आव्हाड, जाधव इत्यादींसह गावातील काही नागरिकांनी मंदिरामध्ये जाऊन देवाचे पूजन व प्रसाद घेतला. यावेळी वालावकर यांनी गावाची परिपूर्ण रचना व ऐतिहासिक वारसा तसेच येथे होणारे राम मंदिर, राम जन्मोत्सव, देवी मंदिर नवरात्र उत्सव, देवी मंदिर बोहडा उत्सव याबाबत माहिती घेतली. तसेच मागील सिंहस्थ कुंभाचे काळात या गावी राम मंदिर हे दिगंबर आखाड्याचे संबंधित असल्याकारणाने येथेही दिगंबर आखाड्याची चौकी म्हणून प्रसिद्ध असल्याने कुंभाचे ध्वजारोहन पार पडले होते याबाबतही माहिती जाणून घेतली. (फोटो ०५ जानोरी,०१,०२)