पोलीस आयुक्तालयामधील बहुतांश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा कार्यकाळ एकाच पोलीस ठाण्यात किंवा एकाच विभागात कार्यकाळ पूर्ण झाला आहे. दरम्यान, पंचवटी व म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या दोघा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांबाबत पोलीस प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
शनिवारी रात्री संपूर्ण राज्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर करण्यात आली. पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण केल्याने शासकीय नियमानुसार त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. दरम्यान, भगत यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे तर ढोकणे यांची म्हसरूळ पोलीस ठाण्यातून नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. भगत यांनी यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यातदेखील सेवा बजावली आहे, तसेच ढोकणे यांनीही यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात सेवा दिली आहे. त्यांच्या रिक्त पदांवर आता कोणाची वर्णी लागणार? याकडे आता पंचवटी, म्हसरुळ भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
--इन्फो--
गुन्हेगारी रोखण्याचे अन् भाविक पर्यटकांना सुरक्षा देण्याचे आव्हान
या दोन्ही पोलीस ठाण्यांची हद्द संवेदनशील समजली जाते. पंचवटीच्या हद्दीत जुन्या झोपडपट्ट्यांसह गावठाणचा परिसर तर म्हसरुळच्या हद्दीत म्हसरुळ गावासह आजूबाजूला म्हसरुळ शिवारात वसलेल्या नवनवीन वसाहती, कॉलन्या व उपनगरांचा परिसर येतो. यामुळे या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याचे, तसेच अवैध धंदे रोखण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस प्रमुखांपुढे असणार आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य म्हणजे धार्मिक पर्यटन स्थळे येत असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेबाबतदेखील उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
160821\16nsk_37_16082021_13.jpg~160821\16nsk_38_16082021_13.jpg
अशोक भगत (कॅपमध्ये)पंढरीनाथ ढोकणे~अशोक भगत (कॅपमध्ये)पंढरीनाथ ढोकणे