कळवण, सुरगाण्यात इंटरनेटचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:34+5:302021-05-20T04:15:34+5:30

कळवण : शैक्षणिक व आरोग्य हिताच्या दृष्टीने मोबाईल नेटवर्क आता आदिवासी भागात जीवनावश्यक झाल्यामुळे कळवण तालुक्यात ३२ व ...

Report, Internet network in Surgana | कळवण, सुरगाण्यात इंटरनेटचे जाळे

कळवण, सुरगाण्यात इंटरनेटचे जाळे

Next

कळवण : शैक्षणिक व आरोग्य हिताच्या दृष्टीने मोबाईल नेटवर्क आता आदिवासी भागात जीवनावश्यक झाल्यामुळे कळवण तालुक्यात ३२ व सुरगाणा तालुक्यात ३३ ठिकाणी मोबाईलचे टॉवर नेटवर्क जोडण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली.

जानेवारी २०२१ मध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर तत्काळ पावले उचलण्यात आली.

त्यानुसार

सुरगाणा तालुक्यातील राक्षस भुवन, भवाडा, भेंडवळ, फणसपाडा, आमदा पळसन, बाफळून, तोरण डोंगरी, अलंगुण, उंबरठाण, करंजुल, हाडकाईचोंड, आंबाठा, कोठुळा, भोरमाळ, खोबळा, धुरापाडा, काशी शेम्बा, शिंगलचोंड, सराड, हतगड, बोरगाव ते गुजरात हद्दीपर्यंतची गावे भूमिगत दूरसंदेश वाहक तारांद्वारे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

-----------------

मोखपाडा, सांभरखल, ठाणगांव, आंबोडे, आळिवपाडा, रानपाडा, खिराड, खिर्डी, खोकरविहीर, देशमुखनगर, गोंददगड, गोपालनगर, वाघधोंड, भेगू, सावरपाडा, वांगण, बर्डा, सालभोये, दांडीचीबारी, हरणटेकाडे, जामुनमाथा या गावातील टॉवरदेखील नेटवर्कने जोडली जाणार आहेत.

कळवण तालुक्यातील जयदर, दळवट, चिंचपाडा, गणोरे, शिरसमणी, शिरसा, देवळीकराड, बोरदैवत, सरलेदिगर, मुळाणे, करंभेळ, गोपाळखडी, आठंबे, दरेभणगी, बिजोरे, मानूर, हिंगळवाडी, गोबापूर, पिळकोस येथे टॉवर सक्षम नेटवर्कने जोडण्यात येत आहे.

-------------------------

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी व आदिवासीबहुल ग्रामीण भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरासारखीच अति दुर्गम डोंगराळ भागातदेखील मोबाईल नेटवर्कची आवश्यकता आहे. त्यासाठीच आदिवासी तालुकादेखील टेक्नोसॅवि व्हावा, यासाठी संपूर्ण तालुक्यात इंटरनेटच्या सुविधेसह मोबाईल नेटवर्कचे जाळे विणले जाणार आहे.

- नितीन पवार, आमदार

Web Title: Report, Internet network in Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.