येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:51 PM2019-03-02T23:51:02+5:302019-03-02T23:51:44+5:30
येवला पाणीप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
येवला : शहरातील तलावातील पाणीसाठा पूर्णत: संपुष्टात आला असल्याने येवला शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी येवला पालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, रु पेश लोणारी, सचिन मोरे, रु पेश दराडे, अमजद शेख, शफीक शेख, संतोष परदेशी उपस्थित होते. प्रस्तुत मागणीबाबत जिल्हा प्रशासनावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे
खेडकर यांनी यावेळी सांगितले. पालखेड धरणातून १ मार्चला
पाणी आवर्तन देण्याचे मान्य करूनही पाणी सोडले नाही म्हणून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येवला शहराला पाणी पालखेड धरणातून पाणी द्यावे अशा आशयाचे निवेदन दिले.
शहराला सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० दिवसापासून पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत असून आता तर पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीच शिल्लक नसल्याने नागरिकांची हाल सुरु झाले आहे. काही भागात तर थेंबभर पाणी देखील मिळत नाही ही परिस्थिती आहे. पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटलेले नसून शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेठाक झाले आहेत..नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु असतांना नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी टंचाई गंभीर आहे तिथे टँकरने पाणीपुरवठा करावा असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकानी प्रांताधिकारी यांचेकडे दोन दिवसापूर्वी धरला होता.