लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी दिगंबर पंडित निकम यांच्या शेतात कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव व तालुका कृषि अधिकारी, देवळा यांचे चमूने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रास प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली. सदर भेटी दरम्यान मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी संदर्भात शास्त्रज्ञ यांनी सुचिवलेल्या खालील प्रमाणे उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केले.१) पेरणी झाल्यानंतर १५ दिवसांनी एकरी १० पक्षी थांबे व ५ कामगंध सापळे लावावे.२) मका पिकात पेरणीपासून पहिल्या १०-१५ दिवसात 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा १०००० पीपीम निम आॅइल २ मिली/लि फवारणी किंवा १५०० पीपीएम असल्यास ५ मिली प्रती लिटर प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी.३) जर प्रादुर्भाव १० टक्के असल्यास इमामेकटीन बेंझोएट ५ टक्के एसजी ८ ग्रॅम/पंप किंवा स्पिनोटोरंम ११.७ इसी ७ मिली/पंप फवारणी घ्यावी.शेतकऱ्यांनी सदर उपाययोजना केल्यास लष्करी आळी नियंत्रणात राहून उत्पन्नावर काहीही परिणाम होणार नसल्याचे उपस्थित मार्गदर्शन करण्यात आले आहे. शेतकºयांनी घाबरून न जाता प्राथमिक स्वरूपात पक्षी थांबे तसेच फेरोमोन ट्रॅप आदी भौतिक उपायोजना कराव्यात, जास्त प्रादुर्भाव असल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्यात यावा असे विभागीय कृषी अधिकारी खैरनार यांनी सांगितले.
मक्यावरील लष्करीअळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रास प्रातिनिधीक स्वरूपात भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 3:55 PM
लोहोणेर : देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील शेतकरी दिगंबर पंडित निकम यांच्या शेतात कृषि विज्ञान केंद्र, मालेगाव व तालुका कृषि अधिकारी, देवळा यांचे चमूने मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रास प्रातिनिधीक स्वरूपात भेट दिली. सदर भेटी दरम्यान मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी संदर्भात शास्त्रज्ञ यांनी सुचिवलेल्या खालील प्रमाणे उपाययोजना करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केले.
ठळक मुद्देलोहोणेर : चमूने सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन