‘सेंट्रल किचन’ ठेका रद्दचा ठराव प्रशासनाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 11:41 PM2020-02-01T23:41:20+5:302020-02-02T00:07:45+5:30

प्राथमिक शाळांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पोषण आहार देताना झालेले गैरप्रकार आणि निविदा पद्धतीतील घोळ यामुळे महासभेने ही पद्धत रद्द करण्याचा केलेला ठराव अखेरीस प्रशासनाकडे पाठविला आहे. आता प्रशासन त्यावर काय कार्यवाही करणार याकडे महापालिका वर्तुळ आणि बचत गटाचे लक्ष लागून आहे.

Resolution for cancellation of 'Central Kitchen' contract is forwarded to the administration | ‘सेंट्रल किचन’ ठेका रद्दचा ठराव प्रशासनाकडे रवाना

‘सेंट्रल किचन’ ठेका रद्दचा ठराव प्रशासनाकडे रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देआता प्रशासनाकडे लक्ष । पंचवटीत खिचडीत अळ्या निघाल्याची चर्चा

नाशिक : शहरातील प्राथमिक शाळांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पोषण आहार देताना झालेले गैरप्रकार आणि निविदा पद्धतीतील घोळ यामुळे महासभेने ही पद्धत रद्द करण्याचा केलेला ठराव अखेरीस प्रशासनाकडे पाठविला आहे. आता प्रशासन त्यावर काय कार्यवाही करणार याकडे महापालिका वर्तुळ आणि बचत गटाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, पंचवटीतील एका शाळेत काही दिवसांपूर्वी पोषण आहारात अळ्या आढळल्या आणि त्यानंतर सर्व भोजन महापालिकेने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, प्रशासन अधिकाऱ्यांनी असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केला आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने सेंट्रल किचनसाठी निविदाप्रकिया राबविलीच नाही उलट त्यात घोळ घातले आणि बचत गट त्यात सहभागी कसे होणार नाहीत याबाबत काळजी घेतली. तीन अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविले तर अन्य शहरांत सेंट्रल किचन राबविणाºया एका ठेकेदारास निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही, असा आरोप महापालिकेच्या महासभेत करण्यात आला होता. निविदाप्रक्रिया राबवितांना घोळ घातले गेलेच परंतु नंतर शाळांना भोजन पुरवतानादेखील त्यात पाल निघणे, भोजनानंतर उलट्या होणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खिचडीच कमी पुरवण्याच्या तक्रारी करूनही महापालिकेने ठेकेदारांवर कारवाई केली नसल्याच्या तक्रारी महासभेत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्व ठेके रद्द करण्याचा ठराव केला होता, मात्र त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाही.

ठेकेदाराने तक्रारकर्त्यांनाच सुनावले
काही दिवसांपूर्वी पंचवटीतील एका शाळेत खिचडीत अळ्या निघाल्याची चर्चा असून, ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित महापालिकेला ठेकेदाराला खिचडी परत घेऊन दुसरी खिचडी आणण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात काही शिक्षकांनी हा प्रकार घडल्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर ठेकेदाराने तक्रारकर्त्यांनाच सुनावल्याचे वृत्त आहे. मात्र, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी कानावर हात ठेवले आहेत.

पंचवटीत कोठेही असा प्रकार घडल्याची माहिती नाही. शाळेत यासंदर्भाच चौकशी केली की चौकशी करणाऱ्यांना ठेकेदार फोन करतात या तक्रारीची देखील शहनिशा केली जाईल. संबंधित मुख्याध्यापकांना याप्रकरणी विचारणा करण्यात येईल.
- देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी, मनपा

Web Title: Resolution for cancellation of 'Central Kitchen' contract is forwarded to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.