पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:49 PM2020-09-25T23:49:49+5:302020-09-26T00:45:05+5:30
नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.
नाशिक : जिल्हयात सुरू असलेल्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली असून, सोयाबीन, मका यासंह द्राक्षांचे नुकसान झाले आहे. कांदा रोप सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त भागातील पीकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत करण्यात आला.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक आॅनलाईन सभा शुक्रवारी (दि.२५) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या सुरूवातीस डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रश्न उपस्थित केला. यंदा जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच गेल्या आठवडयापासून जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप पीकांना बसला असून, कांद्याचे रोप वाया गेले. सोयाबीन पीकात पाणी साचल्याने सडले आहे. मकाही वाया जाण्याची शक्यता आहे. यातच शासनाकडून नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रत्येक तालुका कृषी अधिकाºयाना दिले असल्याचे कृषी सभापती संजय बनकर यांनी सांगितले. परंतू असे असतानाही ठराविक ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याची। तक्रार यावेळी करण्यात आली. नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यात यावी असा ठराव सभेत झाला. या चर्चेत भास्कर गावित, सविता पवार यांनी सहभाग घेतला.
अतिवृष्टीचा फटका पीकांना बसलेला असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांनाही बसला आहे. रस्ते उखडले आहे. रस्ते नादुरूस्त झाले आहेत. पूराने अनेक छोटे वळण बंधारे वाहून गेले आहेत. यासाठी नुकसानग्रस्त रस्ते, बंधारे यांची पाहणी करून अहवाल सादर करावा त्यास शासनाकडून निधीची मागणी करावी असा ठराव बैठकीत झाला. बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती बनकर, सुरेखा दराडे, सुशिला मेंगाळ, आश्विनी आहेर, मुख्यकार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.
कोरोना संकटात आशा, सेविका, सेवक जीवाची बाजी लावून काम करत असताना त्यांना अगदी कमी मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोनाकाळात काम करणाºया आशांना दरमहा एक हजार मानधन देण्यात यावे असा ठराव सभेत झाला. या ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले.