उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:39 AM2021-05-22T01:39:47+5:302021-05-22T01:40:17+5:30
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केले आहे.
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहिर केले आहे.
जिल्ह्यातील कोराेनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १२ ते २३ मे या कालावधीत जिल्हाभरात लॉकडाऊन जाहिर केला होता. या लॉकडाऊनची मुदत येत्या रविवारी संपुष्टात येत असल्याने लाॅकडाऊन शिथील करणार की अधिक वाढविला जाणार याबाबत तमाम नाशिककरांचे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. याप्रकरणी पालकमंत्री छगन
भुजउद्योग सुरू करतांना करखान्यात येणाऱ्या प्रत्येक कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची जबाबदारी घेत असल्याचे हमीपत्र कंपन्यांना देणे बंधनकारक राहाणार आहे. केारोना नियमांचे सर्व प्रकारचे पालन करूनच कामकाज सुरू करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुरू होत्या.यापुढे जीवनाश्यक सेवा राज्य शासनाच्या निर्बंधानुसार सुरू राहतील. बाजार समित्यांचे कामकाज देखील नियमांचे पालन करून सुरू करता येणार आहे. त्यांनाही याबाबतचे हमीपत्र दयावे लागणार आहेया बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगाव मनपाचे भालचंद्र गोसावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. कपील अहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे हजर होते..बळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरेानाची संभाव्य तिसरी लाट, त्ायसंदर्भातील सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपायोजना याबाबतची देखील माहिती घेतली. बालकांसाठी शहर तसेच जिल्ह्यात स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याच्या देखील सुचना त्यांनी दिल्या. म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक ऑपरेशन थिएटर्स कामांना गती देण्यात यावी, ऑक्सीजन जनरेशनचे प्लॅन्ट पुर्ण करावेत, अशा सुचनाही केल्या.
लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही कमी होत आहे. त्यामुळे राज्याचे ‘ब्रेक द चैन’ अंतर्गत असलेले निर्बंध जसेच्या तसे लागू करून जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहिर केले आहे.