पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल  बागलाण तालुक्यात प्रस्थापितांना झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:08 AM2018-03-02T00:08:10+5:302018-03-02T00:08:10+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील डोंगरेज, नामपूर, मुंजवाड व पिंपळदर या पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले.

Result of five Gram Panchayats resulted in defeats of founders in Baglan tehsil | पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल  बागलाण तालुक्यात प्रस्थापितांना झुगारले

पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल  बागलाण तालुक्यात प्रस्थापितांना झुगारले

googlenewsNext
ठळक मुद्देनिकालामध्ये धक्कादायक निकाल नवीन चेहºयांना संधी दिली

सटाणा : बागलाण तालुक्यातील डोंगरेज, नामपूर, मुंजवाड व पिंपळदर या पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. मतदारांनी या पोटनिवडणुकीत प्रस्थापितांना झुगारून नवीन चेहºयांना संधी दिली आहे. या पाचही ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये धक्कादायक निकाल डोंगरेज ग्रामपंचायतीचा लागला असून, प्रभाग क्र मांक तीनमधील सीमा खैरनार यांना १४८ मते मिळून केवळ एका मताने विजय झाला. प्रतिस्पर्धी उमेदवार मंदाकिनी खैरनार यांना १४७ मते मिळाली. विशेष म्हणजे नोटाची दोन मते नोंदविण्यात आली. डोंगरेज ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ च्या अनु. जमाती महिला राखीवमध्ये मंजुळाबाई बोरसे, प्रभाग क्रमांक १ च्या अनुसूचित जमातीमध्ये महादू गांगुर्डे, प्रभाग क्रमांक २ च्या सर्वसाधारण जागेत सरदारसिंग सूर्यवंशी तर प्रभाग क्र. ३ च्या नामाप्र महिला प्रवर्गात सीमा खैरनार यांचा अवघ्या एका मताने विजय झाला. नामपूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गात जयश्री सावंत यांचा विजय झाला. त्यांना ४३९ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार हेमांगी सावंत यांना ३९६ मतांवर समाधान मानावे लागले. मुंजवाड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ च्या सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गात मनीषा जाधव यांचा विजय झाला. पिंपळदर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र मांक ३ च्या सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गात वंदनाबाई पवार या विजयी झाल्या. अंतापूरच्या प्रभाग क्र मांक ४ मधील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी महारु बाई पवार यांचा मोठा विजय झाला. त्यांना ४३५ मते मिळाली, तर पराभूत उमेदवार बापू सोनवणे यांना २६९ मतांवर समाधान मानावे लागले.

Web Title: Result of five Gram Panchayats resulted in defeats of founders in Baglan tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.