नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस / बीडीएस पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे १४ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीट चे निकाल शुक्रवारी (दि.१६) आॅनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहे. नाशिक जिल्'ातून सुमारे ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.राष्ट्रीय परीक्षा परिषदेने (एनटीए ) वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात घेतलेल्या नीट २०२० परीक्षेचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून शुक्रवारी एनटीएकडून ntaneet.nic.in या आधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. नीट निकालाच्या आधारे एमबीबीएस / बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
शुक्रवारी जाहीर होणार 'नीट' चा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 8:34 PM
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस / बीडीएस पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे १४ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात नीट चे निकाल शुक्रवारी (दि.१६) आॅनलाईन पद्धतीने जाहीर केले जाणार आहे.
ठळक मुद्देएनटीएकडून ntaneet.nic.in या आधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार