मालेगाव : तालुक्यातील पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. सुशील जगन्नाथ बागुल ८०.८० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय क्रमांक ओम दत्तात्रेय जाधव ८८.४०, तृतीय क्रमांक सुदर्शन आनंदा मोरे ८७.४० याने मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर. एस. अहिरे, पर्यवेक्षक ए. के. मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------------------
केबीएच विद्यालय, मालेगाव कॅम्प
मालेगाव : येथील केबीएच विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम नचिकेत मच्छिंद्र भदाणे (१०० टक्के), द्वितीय क्रमांक भाग्येश नितीन अहिरे (९९.४), तृतीय क्रमांक रोशन जनार्दन खैरनार व हर्षल भगवान खैरनार ( ९९.२ ), चौथा क्रमांक हर्षल वीरेंद्रसिंह पाटील (९९ ), पाचवा क्रमांक तन्मय विजय शिरसाठ (९८.८), यांचा समावेश आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रवीण पाटील, उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक संजीव महाले, बाळासाहेब सोनवणे, संजय शिंदे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स बाळगून सत्कार करण्यात आला.
जनता विद्यालय, सौंदाणे
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम खैरनार राशी नितीन ९२.६०टक्के, द्वितीय पवार अनुष्का राजू ९०.६०, तृतीय वालझडे स्नेहल तुकाराम ८९.४० यांनी यश मिळवले.