सेवानिवृत्त शिक्षक वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:15 AM2017-11-07T00:15:04+5:302017-11-07T00:15:12+5:30
शैक्षणिक अर्हतेनुसार सलग सेवेनंतर निवड श्रेणीचा लाभ अद्यापही काही सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना मिळालेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
नाशिक : शैक्षणिक अर्हतेनुसार सलग सेवेनंतर निवड श्रेणीचा लाभ अद्यापही काही सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना मिळालेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष माधवराव भणगे यांच्या अध्यतेखाली संपन्न झाली. वर्षभरातील केलेल्या कामकाजासंबंधीचा आढावा माधवराव भणगे, जिल्हाध्यक्ष यांनी दिला. सभेचे कार्यवृत्त वाचन यशवंतराव गायकवाड सचिव यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकप्रश्नी चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तांबट यांनी केले. आभार यशवंतराव गायकवाड यांनी मानले. यावेळी एम. एन. बच्छाव, दिलीप वारे, प्रकाश तांबट, महेश आव्हाड, उत्तमबाबा गांगुर्डे, पुुंडलिक थेटे, आर. डी. सोनवणे, कैलास बाबा, नामदेव सोनवणे, भास्कर मोरे, नथूजी देवरे, रमेश राख, आर. जी. महाजन, किशोर पगार, पी. पी. पगार, वाय. जी. अहिरराव, बाजीराव पाटील, शिवाजी पवार, पी. सी. साळुंखे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध मागण्या
शैक्षणिक अर्हतेसह चोवीस वर्षांच्या सलग सेवेनंतरच्या निवड श्रेणीचा लाभ अद्यापही काही सेवानिृवत्त प्राथमिक शिक्षकांना मिळाला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. निवड श्रेणीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने वंचितांना मिळावा. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक-कर्मचाºयांचे निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेलाच मिळावे. शासनाचा आदेश असूनही एक तारखेला जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांना पेन्शन मिळत नाही. सातवा वेतन आयोग लागू करून त्याप्रमाणे पेन्शन मिळावे, इतरही प्रश्नांवर चर्चा झाली. पेन्शनरांचे प्रश्न लवकरच मार्गी लावावेत. अन्यथा उपोषण करावे असे ठरले.