परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:23 PM2019-10-09T23:23:45+5:302019-10-09T23:24:39+5:30

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.

The return rains are a big blow to the businessmen | परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

Next
ठळक मुद्देसप्तशृंगगड : भाविकांची संख्या रोडावल्याने कोजागरीवर आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.
गडावर शेकडोच्या संख्येने विविध व्यावसायिक आहेत. उत्सव कालावधीत त्यांच्या संख्येत वाढ होते. यात्रोत्सव काळात व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने गुंतवणूक परताव्याच्या भरवशावर करण्यात येते; मात्र या खेपेस विविध आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची माहिती ईश्वर कदम यांनी दिली.
नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गड व परिसरात पावसाने थैमान घातले होते. उत्सव काळातही पावसाने ठरावीक दिवसानंतर हजेरी लावली. त्यात एसटी बसचा अपघात झाला. तसेच नांदुरी-गड मार्गावर दरड कोसळली होती. अवघ्या तासभरात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली. यामुळे भाविकांच्या मनात चलबिचल झाली व याचा नकारात्मक परिणाम भाविकांवर झाला.
फ्यूनिक्युलर ट्रॉली परिसरातील संकुलात सुमारे पन्नासच्या पुढे दुकाने आहेत. बहुतांशी भाविक ट्रॉलीत प्रवास करण्यास अग्रक्र म देतात. नारळ प्रसाद व इतर वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होतो त्यामुळे तोही फटका बसल्याची माहिती सोमनाथ कोकाटे, रेखा जोशी, प्रमिला मोरे, रघुनाथ जोशी, गिरीश गवळी यांनी दिली. दिवाळी सण तोंडावर आला आहे, धंदाच नाही तर सण साजरा कसा करणार? त्यात उधार उसनवार करून, कर्ज काढून व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक परतावा करणे अवघड झाले असून, नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन दिवसात थोडाफार व्यवसाय झाला तरी गुंतवणुकीच्या मानाने तो पुरेसा नसल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.परराज्यासह राज्यातील भाविकांची संख्या कमीभाविकांच्या संख्येत घट झाल्याने व्यावसायिकांना ग्राहकाची वाट पहावी लागल्याची माहिती व्यावसायिक नाना कानडे यांनी दिली. महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले होते. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व गुजरात राज्यातही पावसाने कहर केल्याने तेथील प्रतिवर्षी येणारे भाविक गडावर आले नाहीत. त्याचा फटका सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बसल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बत्तासे यांनी दिली.

Web Title: The return rains are a big blow to the businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.