वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाची आढावा बैठक नुकतीच इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात पार पडली.या आढावा बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य भाबड, साहित्य मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ लेखक पुंजाजी मालुंजकर, शिक्षण समितीचे पदाधिकारी, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे तसेच विविध क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी २२ वे ग्रामीण साहित्य संमेलन २६ व २७ फेब्रूवारीस होणार असल्याने साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रा. देवीदास गिरी यांनी प्रस्ताविक केले. तर पुंजाजी मालुंजकर यांनी साहित्य सनमेलनासाठी लगणाऱ्या आवश्यक बाबींकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. त्याच प्रमाणे विविध समित्यांचे गठन करण्यात आले.यावेळी वैशाली आडके, घोटी महाविद्यालयाचे प्रा. आवारे, बाळासाहेब वालझाडे, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, जेष्ठ लेखक दत्तात्रय झनकर, प्रा. मनोहर घोडे, ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, डॉ. वेलजाळी, प्रा. पाटील, प्रा. परदेशी, डॉ. श्रीमती वाजे, प्रा. रोहिदास उगले, प्रा. शशिकांत रूपवते, प्रा. लायरे आदि उपस्थित होते.
ग्रामीण साहित्य संमेलनाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 4:34 PM
वाडीव-हे : इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाची आढावा बैठक नुकतीच इगतपुरीच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात पार पडली.
ठळक मुद्देविविध समित्यांचे गठन करण्यात आले.